ब्रिटिशकालीन पॉइंटना मिळाली झळाळी

By admin | Published: December 25, 2015 10:01 PM2015-12-25T22:01:52+5:302015-12-25T23:41:34+5:30

महाबळेश्वर : वनविभागाकडून आॅर्थरसिट, एल्फिस्टन पॉइंटवर रंगरंगोटी

British time got light | ब्रिटिशकालीन पॉइंटना मिळाली झळाळी

ब्रिटिशकालीन पॉइंटना मिळाली झळाळी

Next

महाबळेश्वर : पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असणाऱ्या महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉइंटना आता झळाळी मिळाली
आहे. वन विभागाच्या क्षेत्र महाबळेश्वर वन व्यवस्थापन समितीने आर्थरसिट, एल्फिस्टन पॉइंटची साफसफाई व रंगरंगोटी केली असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘नंदनवन’ सज्ज झाले आहे.
महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन असून, वर्षानुवर्षे महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. येथील निसर्ग, वातावरण, हवा पर्यटकांना साद घालत असते. आजदेखील अनेकांच्या घरांतील तिसऱ्या तर अनेकांच्या चौथ्या पिढ्या महाबळेश्वरला नियमित येत असतात. जुन्या आठवणी जागविण्यासाठी काहीजण त्या पॉइंटला पुन्हा-पुन्हा भेट देण्यासाठी आवर्जून येतात.
काही पर्यटक तर संपूर्ण कुटुंबासह नवीन वर्षाचा जल्लोष करण्यासाठी येथे येतात. यापैकी जवळपास ९० टक्के पर्यटक क्षेत्र महाबळेश्वर, एल्फिस्टन पॉइंट व आर्थरसिटकडे हमखास फिरायला जातातच. सर्व पर्यटकांची पहिली पसंती या परिसरालाच असते. याच गोष्टीचे भान ठेवून वन विभागाचे वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र महाबळेश्वर वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ लांगी, सचिव एल. डी. राऊत यांच्यासह समितीच्या सर्व सभासदांनी या परिसरातील पॉइंट स्वच्छ केले. पर्यटकांना केवळ निसर्गाची भुरळ न पडता येथील स्वच्छ व सुंदर परिसरामुळे येथील पॉइंटची देखील भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. या परिसरातील डांबरी रस्त्यांची देखील डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक व पर्यटकांना स्वच्छ प्रसन्नतेची खऱ्या अर्थाने अनुभूती येईल. (प्रतिनिधी)

Web Title: British time got light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.