पदोन्नती आरक्षणासाठी बसपाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:14+5:302021-07-14T04:44:14+5:30

सातारा : अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी ...

BSP's bear agitation for promotion reservation | पदोन्नती आरक्षणासाठी बसपाचे धरणे आंदोलन

पदोन्नती आरक्षणासाठी बसपाचे धरणे आंदोलन

Next

सातारा : अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा संघटक अमर गायकवाड, जिल्हाध्यक्ष आनंद घोरपडे, नारायण काळेल, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष संतोष थोरात, सातारा विधानसभा अध्यक्ष सतीश गाडे, प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्यात, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करावेत, खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात यावे, वाढत्या महागाईला कमी करण्यात यावे, कोरोनामुळे हात घरी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची वीजबिले माफ करण्यात यावी. कोविडमुळे मृत पावलेल्या मृतांच्या परिवारांना आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशा मागण्या या वेळी आंदोलकांनी केल्या.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार बहुजन समाज पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)

फोटोनेम : १३जावेद०२

Web Title: BSP's bear agitation for promotion reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.