बुद्ध जयंती शांतता मार्गाने घरीच साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:57+5:302021-05-27T04:40:57+5:30

तरडगाव : जगाला प्रज्ञा, शील, करुणा याची शिकवण देणारे तथागत भगवान बुद्ध यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांनीच दिलेल्या शांततेच्या ...

Buddha Jayanti celebrated peacefully at home | बुद्ध जयंती शांतता मार्गाने घरीच साजरी

बुद्ध जयंती शांतता मार्गाने घरीच साजरी

Next

तरडगाव : जगाला प्रज्ञा, शील, करुणा याची शिकवण देणारे तथागत भगवान बुद्ध यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांनीच दिलेल्या शांततेच्या मार्गाने साध्या पद्धतीने तरडगाव (ता. फलटण) येथील बौद्ध बांधवांनी घरी राहूनच साजरी केली.

जिल्ह्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पुकारला आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठिकठिकाणी बुद्ध जयंतीसाठी बुद्धविहार, सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता समाज बांधवांनी घरीच राहून भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

येथील बौद्धनगर मधील बौद्ध उपासक, उपासिका यांनी सकाळी मंगलमय वातावरणात आपल्या घरीच राहून शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध पूजा व त्रिसरण पंचशील घेत बुद्धांच्या विचारांना वंदन केले. सर्व समाजासाठी पोषक असणारे बुद्धांचे विचार व त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाच्या पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर झळकत होत्या. तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नातलग मंडळी, कार्यकर्ते एकमेकांबद्दल मंगलकामना व्यक्त करताना दिसले.

Web Title: Buddha Jayanti celebrated peacefully at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.