जगभरातील बुद्धमूर्तींचे सातारकरांनी घेतले दर्शन प्रदर्शनास प्रतिसाद
By Admin | Published: May 15, 2014 12:22 AM2014-05-15T00:22:42+5:302014-05-15T00:22:59+5:30
सातारा : भगवान बुद्ध जयंतीनिमित्त जयभीम फेस्टिव्हल संयोजन समितीच्या वतीने ज्या देशांमध्ये बौद्ध धम्म आहे, तेथील गौतम बुद्धांचे विविध
सातारा : भगवान बुद्ध जयंतीनिमित्त जयभीम फेस्टिव्हल संयोजन समितीच्या वतीने ज्या देशांमध्ये बौद्ध धम्म आहे, तेथील गौतम बुद्धांचे विविध भावमुद्रेतील पुतळे व बुद्ध विहारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सातारकरांनी उपस्थित राहून दुर्मिळ अशा बुद्धमूर्तींचे दर्शन घेतले. नगरपालिकेसमोर भगवान गौतम बुद्धनगरीत बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार असून बुधवारी सकाळी १० वाजता येथील बोधीवृक्षाखाली भंते दिपांकर यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. ११ वाजता बुद्धांच्या मूर्ती तसेच विहारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी, प्राचार्य राजेंद्र शेजवळ, प्राचार्य अरुण गाडे, किशोर तपासे, अण्णा उबाळे, अण्णा वायदंडे, नवनाथ शिंदे, प्रा. बोभाटे, महेंद्र गायकवाड, फारुख पटनी, सचिन वायदंडे, अजिंक्य तपासे, मिलिंद कांबळे, रवींद्र बाबर, आशिष पोळ, बाबा शिंदे, बाबा बोभाटे, प्रकाश वायदंडे, विद्या तपासे, विलास रणखांबे, येवले, दादा माने, तुषार बडेकर, मदन दंदाडे, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते. चित्रप्रदर्शनात ६५० चित्रे ही बुद्धमूर्तींची आहेत, तर ४८ चित्रे ही बुद्ध विहारांची आहेत. यामध्ये चीन, कोरिया, जपान, इंडिनेशिया, मलेशिया, तिबेट, नेपाळ, भारत, म्यानमार, जुने बर्मा, थायलंड, श्रीलंका आदी देशातील बुद्धमूर्ती व विहारांचा समावेश आहे. ड्रॅगनच्या जबड्याचे भव्य प्रवेशद्वार सर्वांचे आकर्षण ठरत आहे. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी सातारकर गर्दी करत आहेत. (प्रतिनिधी)