बुधला ‘एलआयसी’ विमा ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:11 AM2021-02-21T05:11:20+5:302021-02-21T05:11:20+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्यातील बुधला एलआयसीतर्फे २०१८-२०१९ चा ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याअंतर्गत गावाला पन्नास हजार रुपयांचे ...
पुसेगाव : खटाव तालुक्यातील बुधला एलआयसीतर्फे २०१८-२०१९ चा ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याअंतर्गत गावाला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणाऱ्या गावाला दिला जातो.
हा पुरस्कार एलआयसीचे शाखाधिकारी शुभांगी मालवणकर व उपशाखाधिकारी भरत गोडसे यांच्याहस्ते सरपंच अभय राजेघाटगे, उपसरपंच मनीषा कुंभा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी विकास अधिकारी सुधाकर चिखलीकर, राजेश काळे यांनी विम्याचे महत्त्व् सांगितले. आयुर्विमा हा प्रत्येकाचा असणे गरजेचे आहे. विमा ग्रामच्या माध्यमातून विमा प्रतिनिधी आयुर्विमा घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश सातपुरे, प्रसाद पतके, मधुरा पिसाळ, ज्ञानेश्वर जगताप, सोमनाथ बल्लाळ, संतोष देशमुख, माणिक महाडिक, अरविंद कदम, विलास कुलकर्णी, विजया चाळके, नितीन गाडे उपस्थित होते. सरपंच अभय राजेघाटगे यांनी आभार मानले. प्रसाद पतके यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी आभार मानले. (वा. प्र.)
फोटो टी/युजर/१९बुध ग्रामपंचायत
बुध गावाला मिळालेला ‘विमा ग्राम’चा पुरस्कार सरपंच अभयसिंह राजेघाटगे, उपसरपंच मनीषा कुंभार यांनी स्वीकारला. यावेळी गणेश सातपुरे उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)