इमारत नवी; पण टेबलं येणार जुनी!

By Admin | Published: March 27, 2017 10:46 AM2017-03-27T10:46:03+5:302017-03-27T10:46:03+5:30

पोलीस ठाणे इमारतीला पाडव्याचा मुहूर्त : कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यासह उपअधिक्षक कार्यालय होणार स्थलांतरीत; किरकोळ कामे गतीने सुरू

Building new; But the tables are old! | इमारत नवी; पण टेबलं येणार जुनी!

इमारत नवी; पण टेबलं येणार जुनी!

googlenewsNext





आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड : येथील तालुका पोलीस ठाणे व उपअधिक्षक कार्यालयासाठी सर्व सोयी सुविधा असलेली नवी इमारत उभी राहिली आहे. मात्र, आता पैसेच शिल्लक नसल्याने इमारतीमधील फर्निचरचे काम रखडणार आहे. इतर सर्व कामे पुर्ण झाली असताना फक्त फर्निचरसाठी स्थलांतर थांबवावे लागण्याची शक्यता होती; पण या नव्या इमारतीत जुने फर्निचर वापरून कामकाज सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त काढण्यात आला असून इतर किरकोळ कामे गतीने सुरू आहेत.

कऱ्हाड शहर व तालुका पोलीस ठाण्याची इमारत पुवीर्पासून स्वतंत्र आहे. काही वषार्पुर्वीपर्यंत उपअधिक्षक कार्यालयाचे कामकाज शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीमधून चालत होते. मात्र, त्यानंतर उपअधिक्षक कार्यालय बसस्थानकानजीकच्या प्रांत कार्यालय इमारतीत स्थलांतरीत झाले. संबंधित इमारतीत सध्या उपअधिक्षक कार्यालय कार्यरत आहे. दरम्यान, जुन्या तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेले तालुका पोलीस ठाणे नव्या इमारतीचे काम सुरू करताना जुन्या न्यायालय इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. गत तीन वर्षांपासून तालुका पोलीस ठाणे मार्केट यार्डमध्ये कार्यरत आहे. पंचायत समितीसमोरील जुन्या तहसिल कार्यालय व तालुका पोलीस ठाण्याची इमारत पाडून त्याठिकाणी प्रशासकिय इमारत उभी करण्यात आली आहे. तसेच तालुका पोलीस ठाणे व उपअधिक्षक कार्यालयासाठीही स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत कऱ्हाड शहरात शासकिय विश्रामगृह, प्रशासकिय इमारत, तालुका पोलीस ठाण्याची इमारत, बसस्थानक आदी महत्वपुर्ण विकासकामांना मंजूरी दिली. तसेच संबंधित इमारतींचा निधीही तात्काळ त्या-त्या खात्याकडे वर्ग करण्यात आला. प्रशासकिय इमारत तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. सध्या बसस्थानक इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. तर विश्रामगृह, प्रशासकिय इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे. तालुका पोलीस ठाण्याची इमारत व प्रशासकिय इमारतीसाठी सुमारे १७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सुमारे दीड कोटी खर्चुन पोलीस ठाण्याची आकर्षक इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीचे काम पुर्ण झाले असले तरी अद्याप अंतर्गत फर्निचरचे काम बाकी आहे. फर्निचरसाठी सुमारे चाळीस लाख रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, निधीच शिल्लक नसल्याने फर्निचरच्या कामासाठी विलंब लागला आहे.

गुढीपाडव्याला या इमारतीत तालुका पोलीस ठाणे व उपअधिक्षक कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जुनेच साहित्य या इमारतीमध्ये आणण्यात येणार आहे. टेबल, खुर्च्या, कपाट यासह इतर सर्व साहित्य जुन्या इमारतीमधून आणून येथे ठेवण्यात येणार आहे. पुढील निधी उपलब्ध होऊन फर्निचरचे काम पुर्ण होईपर्यंत उपलब्ध साहित्याचाच वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा
पोलीस ठाण्यांचे दैनंदिन कामकाज संगणकीकृत झाले आहे. एफआयआरसह इतर नोंदी संगणकावर मुद्रीत केल्या जात आहेत. तसेच त्या नोंदी इंटरनेटद्वारे तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्या जात आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या नविन इमारतीत वीज कनेक्शनसह इंटरनेट कनेक्शनची अत्याधुनिक सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला व पुरूष आरोपींसाठी स्वतंत्र लॉकअपही आहेत. याच इमारतीत पोलीस उपअधिक्षक कार्यालयही असणार आहे.

पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. सध्या वीज तसेच इंटरनेटसाठी आवश्यक असणाऱ्या फिटींगचे काम सुरू आहे. हे काम तात्काळ पुर्ण करून गुढीपाडव्यापासून या इमारतीत स्थलांतर करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.
- राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपअधिक्षक, कऱ्हाड

Web Title: Building new; But the tables are old!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.