पुण्यात अपघातात मृत्यू झालेला बैल कुडाळमध्ये टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 03:25 PM2021-07-07T15:25:08+5:302021-07-07T15:29:19+5:30

Crimenews Satara police : सरताळे, ता. जावळी येथे एका बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर यातील वेगळाच प्रकार समोर आला. पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावामध्ये शर्यतीच्या बैलाचा अपघात झाला. त्यानंतर त्या बैलाचा मृतदेह रात्रीच्या सुमारास सरताळेजवळ आणून टाकला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

A bull that died in an accident in Pune was thrown into a spade | पुण्यात अपघातात मृत्यू झालेला बैल कुडाळमध्ये टाकला

पुण्यात अपघातात मृत्यू झालेला बैल कुडाळमध्ये टाकला

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात अपघातात मृत्यू झालेला बैल कुडाळमध्ये टाकला अज्ञातावर गुन्हा; टेम्पोला बांधून ओढताना मोडले पाय

सातारा : सरताळे, ता. जावळी येथे एका बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर यातील वेगळाच प्रकार समोर आला. पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावामध्ये शर्यतीच्या बैलाचा अपघात झाला. त्यानंतर त्या बैलाचा मृतदेह रात्रीच्या सुमारास सरताळेजवळ आणून टाकला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरताळे, ता. जावळी परिसरातील निर्जनस्थळी एका झाडाजवळ सोमवारी सकाळी एका बैलाचा मृतदेह आढळून आला होता. या बैलाची हत्याच करण्यात आली, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू केला. त्या वेळी धक्कादायक माहिती समोर आली.

पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत किकली हे गाव आहे. या गावच्या परिसरात शर्यतीच्या बैलाचा अपघात झाला. त्या अपघातात बैलाचा मृत्यू झाला. संबंधिताने बैलाची भरपाईसुद्धा घेतली. पण आता या बैलाचा मृतदेह टाकायचा कुठे, असा प्रश्न संबंधिताना पडला. सरतेशेवटी एका टेम्पोमधून बैलाचा मृतदेह जावळी तालुक्यातील सरताळे या ठिकाणी आणला.

महामार्गावरून रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी शोधून बैल टेम्पोतून खाली टाकला. मात्र, रस्त्यापासून मृतदेह बाजूला नेताना त्यांनी बैलाचा पायाला दोर बांधला. त्यानंतर टेम्पोने ओढत नेला. त्यामुळे या बैलाचे पाय मोडले. या प्रकरणी संबंधितांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: A bull that died in an accident in Pune was thrown into a spade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.