पोवई नाक्याजवळ बैल बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:02 AM2017-10-17T00:02:07+5:302017-10-17T00:02:10+5:30

Bull Market near Powai Naka | पोवई नाक्याजवळ बैल बाजार

पोवई नाक्याजवळ बैल बाजार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘बैल आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा...!,’ असं म्हणतच बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अनोखे आंदोलन केले. सुमारे एक हजार बैल जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोरच दावणीला बांधण्यात आली होती.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी केंद्र्र आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा, या मागणीसाठी सोमवारी राज्यातील बैलगाडी चालक-मालक संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले.
दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला बैलबाजाराचे स्वरूप आले होते. तसेच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने पर्यायी रस्त्यावर दिवसभर वाहतुकीची कोंडी होती.
आंदोलनात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, जालना, औरंगाबाद, बीड, अमरावती, नगर यासह अन्य जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले आहेत.
यावेळी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलांना बांधत घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली.
यावेळी शेतकºयांनी बैलाच्या पाठीवर ‘मला वाचवा, पेटा हटवा’ अशा पद्धतीचे स्लोगन लिहिल्याचे दिसून येत होते. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्र्वांनी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मोर्चा काढला. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सर्वजण पुन्हा आंदोलनस्थळी आले.
दिवसभरात विविध संघटना, नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. बैलाची गैरसोय होऊ नये, यासाठी चारा आणि पाण्याची सोय करण्यात आली होती.
या परिसरातील वाहतूक दुपारी अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागाला. दिवसभर वाहतूक बंद असल्याने पर्यायी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.
विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ बैलासह राज्यव्यापी आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्यातील विविध जिल्ह्णांतून, तालुक्यांमधून, गावांमधून मोठ्या प्रमाणात बैलासह बैलगाडी चालक-मालक आंदोलनस्थळी येत होते. बघता-बघता जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला बैलबाजाराचे स्वरूप आले.
अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे प्रताप झांजुर्णे, ब्रम्ह पैलवान, अक्षय घोरपडे, विष्णू यादव, सागर बर्गे, रोहन बर्गे, अनिल काटकर, अण्णा पैलवान, अक्षय मोरे सह राज्यभरातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.
साताºयातून येणाºया-जाणाºयांसाठी हे अनोखे आंदोलन होते. त्यामुळे या मार्गावरून जाणारे लोक थांबून विचारपूर करत होते. तर काहीजण या आंदोलनाचे मोबाईलवर चित्रीकरण करत होते. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत होती. ती टाळण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेट आडवे लावले होते. तरीही एखादी दुसरी कार आली तर तिला बाहेर पडणे अवघड जात होते.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोवईनाक्याकडून कोरेगाव रोडला जाणारी वाहतूक पर्यायी मार्गावरुन वळविली.
दिवाळीत आंदोलन
या आंदोलनाला आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्यसरकारने कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून लवकरात लवकर बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी केली. हे आंदोलन घरचे असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत, अशी भावना संघटनेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली.
आम्हीच झाकतो डोळे
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी मालक मंडळी आंदोलन करत असताना त्यांना सोबत देणाºया बैलाने असे डोळे झाकून शासनाच्या चुप्पीचे दर्शन घडविले.
घेतल्याशिवाय राहत नाय..
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे दोन बैल मोठ्या आवाज करत होते. जणू घेतल्याशिवाय राहत नाही, असंच त्यांचं म्हणणं होतं.

Web Title: Bull Market near Powai Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.