म्हसवडच्या सराफानेच लुटले अकलूजच्या सराफाला, चौघांना अटक; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By दीपक शिंदे | Published: September 28, 2022 08:09 PM2022-09-28T20:09:08+5:302022-09-28T20:09:37+5:30

विशेष म्हणजे ही लूटमार म्हसवडमधील एका सराफाने कट रचून केली असल्याचे तपासात निष्पन्न

Bullion of Mhaswad robbed the bullion of Akluj, 18 lakhs worth of goods seized in satara district | म्हसवडच्या सराफानेच लुटले अकलूजच्या सराफाला, चौघांना अटक; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

म्हसवडच्या सराफानेच लुटले अकलूजच्या सराफाला, चौघांना अटक; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

सचिन मंगरुळे

म्हसवड : अकलूजच्या सराफाला वाटेत अडवून त्यांच्याकडील १५ लाखांचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून ४३५ ग्रॅम सोन्यासह १७ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे ही लूटमार म्हसवडमधील एका सराफाने कट रचून केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सराफ व्यावसायिक दुर्वा ऊर्फ दुर्योधन नाना कोळेकर (वय ३४, रा. धुळदेव, ता. ताण, जि. सातारा), योगेश तुकाराम बरडे (३५, रा. पिलीव रोड, बरडे वस्ती, माळशिरस, जि. सोलापूर), रामदास विठ्ठल गोरे (२०, रा. म्हसाळवाडी, ता. माण, जि. सातारा), रणजित भाऊ कोळेकर (२०, रा. धुळदेव, ता. माण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराफ व्यावसायिक सुरेशकुमार हिंमतराव कुमावत (३९, रा. अकलूज, जि. सोलापूर) हे २७ जुलै २०२२ रोजी म्हसवडमधील सराफ व्यावसायिकांना दागिने देण्यासाठी आले होते. त्याच दिवशी सायंकाळी दुचाकीवरून ते परत जात असताना वाटेत अडवून त्यांना नकली पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील १५ लाखांचे दागिने चोरून नेले होते. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच या जबरी चोरीचा मुख्य सूत्रधार हा म्हसवडमधील दुर्वा कोळेकर हा सराफ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अन्य सहकाऱ्यांचीही नावे सांगितली. यानंतर पोलिसांनी संबंधितांना पालघर, नालासोपारा येथून ताब्यात घेतले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या जबरीचा चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत काैशल्याने छडा लावला. या चोरट्यांकडून ४३५ लगड स्वरूपातील सोने आणि कार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, उत्तम दबडे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Bullion of Mhaswad robbed the bullion of Akluj, 18 lakhs worth of goods seized in satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.