उपजिल्हाधिकाºयांचा बंगला फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:50 PM2017-09-18T23:50:46+5:302017-09-18T23:50:46+5:30

Bungalow of Deputy District Officer | उपजिल्हाधिकाºयांचा बंगला फोडला

उपजिल्हाधिकाºयांचा बंगला फोडला

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांचा कºहाडातील बंगला चोरट्यांनी फोडला. येथील रुक्मिणीनगरमध्ये घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बंगल्यातून काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील रुक्मिणीनगरमध्ये बिंदुमाधव जोशी यांचा ‘चैतन्य’ नावाचा बंगला आहे. बिंदुमाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजय जोशी हे सिंधुदुर्ग येथे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. गत काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्याने बिंदुमाधव जोशी हे मुलगा विजय यांच्याकडे राहण्यास गेले आहेत, तर त्यांच्या कोल्हापूर येथील शेतात मजूर म्हणून काम करत असलेले भरत कुंभार हे काही दिवसांपासून कºहाडमध्ये राहत आहेत.
त्यांच्याकडेच जोशी यांच्या बंगल्याची चावी असून, तेच बंगल्याची देखभाल करीत असतात. नेहमीप्रमाणे भरत कुंभार हे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जोशी यांच्या बंगल्याकडे गेले असता त्यांना गेटला लावलेले कुलूप तसेच दिसले. मात्र, घराचे कुलूप तोडून कट्ट्यावर टाकले होते. सेफ्टीडोअरचे कुलूपही तुटलेले आणि लाकडी दरवाजाची कडी कापलेली होती. कुंभार यांनी तेथूनच मालक बिंदुमाधव जोशी यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यावेळी जोशी यांनी कुंभार यांना पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले.
अज्ञातावर
गुन्हा दाखल
कºहाड शहर पोलिसांनी त्वरित श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. देवघरातील मौल्यवान वस्तू तशाच होत्या. तिजोरीचे कुलूप तोडण्याचा व तिजोरी वाकविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे पोलिसांना दिसून आले. बंगल्यातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मालक स्वत: आल्यानंतर काही गेले असल्यास ते समक्ष सांगतील, असेही कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भरत कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कºहाड शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Bungalow of Deputy District Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.