दुचाकी चोरून पळालेल्या ऊसतोड मजुरास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:41+5:302021-05-01T04:37:41+5:30
फलटण : सातारा शहराजवळून दुचाकी चोरून पळून जाणाऱ्या परजिल्ह्यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. राष्ट्रपाल साहेबराव अंभोरे (वय ३८, ...
फलटण : सातारा शहराजवळून दुचाकी चोरून पळून जाणाऱ्या परजिल्ह्यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. राष्ट्रपाल साहेबराव अंभोरे (वय ३८, रा. वाघाळा, ता. पाथरी, जि. परभरणी) असे संबंधिताचे नाव आहे. अंभोरे हा ऊसतोड मजूर आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दुचाकी चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईची सूचना केली होती. त्यानंतर पथकाने आदर्की फाटा येथून फलटणच्या दिशेने वेगाने जात असणाऱ्या दुचाकी चोरट्यास शिताफीने पकडले. त्यानंतर राष्ट्रपाल अंभोरे याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. अंभोरेने सातारा शहराजवळील कोडोली येथून दुचाकी चोरली होती.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, मोहन नाचण, साबीर मुल्ला, राजकुमार ननावरे, अर्जुन शिरतोडे, अमित सपकाळ, अजित कर्णे, प्रवीण पवार, केतन शिंदे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
................................................