साताऱ्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच, पाच दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:12 PM2020-03-03T19:12:43+5:302020-03-03T19:14:02+5:30
सातारा येथील बुधवार पेठेतील पाच घरे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. मार्केट यार्ड परिसरातील पाच दुकाने फोडल्याचे सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आले. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता आहे.
सातारा : येथील बुधवार पेठेतील पाच घरे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. मार्केट यार्ड परिसरातील पाच दुकाने फोडल्याचे सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आले. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार पेठेतील लकडी पूल परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून पाच घरे फोडली होती. यामध्ये सुमारे चार लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. शाहूपुरी पोलीस या चोऱ्याचा तपास करत असतानाच दुसऱ्या दिवशीही सलग साताऱ्यात चोरीचे सत्र सुरूच असल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.
मार्केट यार्ड परिसरामध्ये सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडली. यामधून नेमका किती ऐवज चोरीस गेला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गत आठवड्यात बीट मार्शल पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी २५ अत्याधुनिक दुचाकी देण्यात आल्या आहेत. या दुचाकींद्वारे शहरातून गस्त घातली जात असताना अशा प्रकारे चोºया होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.