घरफोडी, बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोन टोळ्या हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:18 AM2019-12-17T11:18:56+5:302019-12-17T11:21:58+5:30
वाई तालुका आणि वडूज (ता. खटाव) येथे घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांतील सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सातारा: वाई तालुका आणि वडूज (ता. खटाव) येथे घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांतील सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
टोळी प्रमुख आकाश शिवाजी वाघले-जाधव (वय २७, रा. गुलमोहर कॉलनी, वाई), करण रामसिंग घाडगे (वय २१, रा.सैदापूर,सातारा), राहूल अमर घाडगे (वय १८, रा. लाखानगर, वाई) भूपाल किसन घाडगे (वय ४०), कैलास भानुदास काळे (वय २८, दोघे रा.सैदापूर, सातारा) अशी साताऱ्यातील टोळीची नावे आहेत.
तर सौरभ सुनिल जाधव (वय २२), सौरभ विजय कुलकर्णी (वय २१, दोघे रा. गुरसाळे, ता. खटाव) अशी वडूज येथील तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, आकाश वाघले याच्या टोळीवर वाई या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर सौरभ जाधव याच्या टोळीवर बेकायदेशीर पिस्टल बाळगल्याचा वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या दोन्ही टोळ्यातील सातही सदस्यांवर वेळोवेळी कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आल्याच्या तक्रारी पोलीस दलाकडे आल्या होत्या. त्यामुळे वाई व वडूज पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता.
त्यावर सुनावणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आकाश वाघले व त्याच्या टोळीतील सदस्यांना वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यातून तर सौरभ जाधव याच्या टोळीतील सदस्यांना खटाव, माण, फलटण, कोरेगाव, सातारा या तालुक्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.