मुकादमाने नाकारले पैसे! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोटात घास; मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर 

By नितीन काळेल | Published: December 14, 2023 08:19 PM2023-12-14T20:19:41+5:302023-12-14T20:19:52+5:30

मध्य प्रदेशमधून सातारा जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांना मुकादमाने पैसे दिले नाहीत.

Burn the hearth in front of the collector's office of satara Sugarcane workers in Madhya Pradesh | मुकादमाने नाकारले पैसे! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोटात घास; मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर 

मुकादमाने नाकारले पैसे! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोटात घास; मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर 

सातारा : मध्य प्रदेशमधून सातारा जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांना मुकादमाने पैसे दिले नाहीत. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे गरीब ६५ मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून स्वत:सह लहान मुलांच्या पोटात दोन घास घातले. तसेच कामाचे पैसे मिळण्यासाठी आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्जव केले आहे. याबाबत शुक्रवारी निर्णय होणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेश येथून ऊस तोडणीसाठी ६५ मजूर एका मुकादमाने आणले आहेत. खटाव तालुक्यात त्यांची ऊसतोड सुरू होती. यासाठी त्यांना दिवसाला काही रक्कम देण्याचे ठरले होते. काही दिवस काम केले. त्यांना थोडे पैसे दिले. पण, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. काम केल्यानंतर पैशाची मागणी केली असता ठेकेदाराने भांडण करुन मारहाण केली.

 यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. याबाबत ऊसतोड मजूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तेथेही त्यांची पदरी निराशाच आली. त्यामुळे हे मजूर बायकाे-मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्याबाहेर मुक्कामी आले. त्यावेळी ‘रिपाइं’च्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर धुमाळ यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधितांची विचारपूस करुन मदत देऊ केली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाशीही चर्चा केली. त्यानंतर याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याचे निश्चित झाले. दरम्यान, मध्यप्रदेशातील या ऊसतोड मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवली आहे. त्यांच्याबरोबर महिला तसेच लहान मुलेही आहेत. गुरुवारी दिवसभर ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच होते. येथेच त्यांनी रात्रीचाही आसरा घेतला.
 
मध्यप्रदेशातील काही ऊसतोड मजूर सातारा जिल्ह्यात आले आहेत. त्यांना मुकादमाने पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसरा घेतला आहे. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाशी चर्चा करण्यात आली. संबंधित कारखानदारही होते. ऊसतोड मजुराच्या पैशाबाबत शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल. - संजय गाडे, जिल्हाध्यक्ष ‘रिपाइं’ गवई गट

Web Title: Burn the hearth in front of the collector's office of satara Sugarcane workers in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.