तेरा एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:43+5:302021-03-18T04:38:43+5:30
मसूर : चिखली ता. कऱ्हाड येथे थळोबा मंदिरामागचा १३ एकरांतील ऊस आगीत जळून खाक झाला. यात एकूण ३० ...
मसूर : चिखली ता. कऱ्हाड येथे थळोबा मंदिरामागचा १३ एकरांतील ऊस आगीत जळून खाक झाला. यात एकूण ३० शेतकऱ्यांचे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना आग विझविण्यासाठीचा प्रयत्न करता आला नाही. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
चिखलीत थळोबा मंदिरामागे दोन दिवसांपूर्वी अचानक शेतातील उसाला आग लागली. त्यानंतर शेजारच्या एकूण १३ एकर क्षेत्रातील शेतातील उसाला आग लागत गेली. त्यामध्ये ३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कष्ट करून उभा केलेला ऊस जळताना पाहून शेतकरी हताश झाले. प्रारंभी शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने वायरमन शैलेश शिंदे यांनी ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूज काढून वीजप्रवाह बंद केला. मात्र, आग शॉर्टसर्किटने लागली नाही, याची खात्री झाली. विजय पाटील, भिकू सावंत, भानुदास सावंत, सुरेश सावंत, दिनकर सावंत, कुसुम सावंत, दादासाहेब सावंत, राजेंद्र सावंत, ज्ञानदेव सावंत, संभाजी सूर्यवंशी, निवृत्ती सावंत, गोपीनाथ कांबळे, सुहास क्षीरसागर, वच्छला क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, हणमंत क्षीरसागर, भगवान क्षीरसागर, वासुदेव क्षीरसागर, श्यामराव क्षीरसागर, मच्छिंद्र क्षीरसागर, बाळासाहेब क्षीरसागर, प्रमोद क्षीरसागर, भरत क्षीरसागर, राजाराम क्षीरसागर, प्रल्हाद क्षीरसागर, कृष्णाजी क्षीरसागर या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे.
उपसरपंच महेश पाटील यांनी शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. मंडळाधिकारी श्रीराम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी रमेश लाखे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. पोलीस पाटील, चंद्रकांत माळी घटनास्थळी उपस्थित होते.
फोटो : १७केआरडी०२
कॅप्शन : चिखली येथे १३ एकरांतील ऊस जळून खाक झाला.