नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:41 PM2019-05-06T14:41:59+5:302019-05-06T14:45:06+5:30

ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नदीत कोसळणारी बस चक्क झाडावर धडकवून २५ प्रवाशांचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील रेल्वे पुलानजीक घडली. वेगात असलेली बस झाडावर धडकल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bus driver shook the bus, 25 passengers read in Pran | नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण

नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण

Next
ठळक मुद्देनदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली२५ प्रवाशांचे वाचले प्राण : कोरेगाव रेल्वेपुलानजीक घटना

सातारा : ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नदीत कोसळणारी बस चक्क झाडावर धडकवून २५ प्रवाशांचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील रेल्वे पुलानजीक घडली. वेगात असलेली बस झाडावर धडकल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दहिवडीहून साताऱ्याला एसटी येत होती. कोरेगाव रेल्वेपुलानजीक बस आल्यानंतर अचानक एसटीचा ब्रेक निकामी झाला. त्यावेळी पुढे नदीचे विस्तीर्ण पात्र होते. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्याकडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर धडकवली.

एसटीचा वेग जास्त असल्यामुळे बस झाडावर जोरदार धडकल्याने आतील प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यामुळे अनेकांची डोकी फुटली तर काहींच्या हाताला, छातीला मुका मार लागला. या अपघातानंतर सर्व प्रवाशांना एसटीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चालकाने एसटी झाडावर धडकवली नसती तर, या विचारानेच प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने २५ प्रवाशांचे प्राण वाचले. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. पुढे काही अंतरावर नदी दिसत होती. हे चित्र आपल्या मोबाईलमध्ये अनेकजण टिपत होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.

Web Title: Bus driver shook the bus, 25 passengers read in Pran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.