बसथांबे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:46+5:302021-04-13T04:37:46+5:30
मल्हारपेठ : कऱ्हाड-नवारस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ ...
मल्हारपेठ : कऱ्हाड-नवारस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.
टपालपेट्या शोपीस
कऱ्हाड : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या टपालच्या पेट्यांची दुरवस्था झाली आहे. संबंधित विभागाकडून त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वर्षांपासून या टपाल पेट्यांमध्ये पत्रेच पडणे बंद झालेले आहे. मात्र, तरीही या बिकट परिस्थितीत पोस्ट आपली सेवा तग धरून आहे.
फुटपाथची दुरवस्था
कऱ्हाड : शहरातील दत्तचौक ते कृष्णा नाका या मार्गादरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या पादचारी मार्गावर ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून पादचाऱ्यांना यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
नेटवर्क गायब
सणबूर : बनपुरी परिसरात मोबाइलचे नेटवर्क गायब असून मोबाइल कंपनीचे टॉवर ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मोबाइलधारकांना रेंज मिळवण्यासाठी झाडांवर किंवा घरांच्या छतावर जावे लागत आहे. सध्या शिक्षणासह दैनंदिन कामातही इंटरनेटची गरज भासते. मात्र, या विभागात मोबाइलला रेंज नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
मार्गावर अतिक्रमण
कऱ्हाड : येथील दत्त चौक ते आझाद चौक परिसरातील रस्त्याकडेला किरकोळ दुकानदारांकडून व साहित्य विक्रेत्यांनी जाहिरात फलक ठेवून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पादचारी मार्गावर अस्ताव्यस्त फलक लावणाऱ्यांवर पालिकेकडून कडक कारवाई करणे गरजेचे आहे.