साताऱ्यात कर्जबाजारीपणला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:35 PM2021-10-12T22:35:58+5:302021-10-12T22:40:01+5:30
शहरापासून जवळच असलेल्या महादरे तळ्याशेजारील एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सातारा : येथील शुक्रवार पेठेतील जिजामाता काॅलनीत राहणारे भरत लक्ष्मण वाईकर (वय ५०) यांनी महादरे तळ्याशेजारील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भरत वाईकर हे दूधाचा व्यवसाय करत होते. ते कर्जबाजारी झाल्याने सतत नैराश्यात असायचे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी ते घरातून बाहेर पडले. शहरापासून जवळच असलेल्या महादरे तळ्याशेजारील एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास`थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार सुहास पवार हे अधिक तपास करत आहेत.