पाचगणीत संचारबंदीचा व्यावसायिकांना विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:04+5:302021-06-28T04:26:04+5:30
पाचगणी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शासनाने अत्यावश्यक सेवेच्या मेडिकल दुकानांना आठवडाभर तर इतर सर्वच व्यावसायिकांकरिता शनिवार, रविवार ...
पाचगणी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शासनाने अत्यावश्यक सेवेच्या मेडिकल दुकानांना आठवडाभर तर इतर सर्वच व्यावसायिकांकरिता शनिवार, रविवार संचारबंदी सक्तीचा केला असताना काही दुकानदारांनी नियमभंग केल्याने रविवारी पाचगणी नगरपरिषदेच्या भरारी पथकाने त्यांच्यावर कारवाई करीत दुकाने बंद केली.
पाचगणी पर्यटनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेडिकल वगळता सर्वच व्यवसायांकरिता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी लॉकडाऊन सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे इतर व्यवसाय बंदच आहेत. तरीसुद्धा काही व्यावसायिकांनी कोरोनाचा विसर पडल्यासारखे सकाळी व्यवसाय सुरू केले होते. हे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकाच्या लक्षात आल्याने पथकाने तत्काळ जाऊन या चार दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून २५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेच्या या भरारी पथकाने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. यामध्ये सूर्यकांत कासुर्डे, सुनील शिंदे, रवी कांबळे, सुनील महाडिक, जयंती गुजर, सागर बगाडे, सागर मोरे, राहुल कदम, विशाल स्वामी, आकाश वनने यांनी सहभाग घेतला.
२७पाचगणी
पाचगणी येथे शनिवार, रविवार संचारबंदीच्या काळात दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर नगरपरिषद भरारी पथकाने कारवाई केली.