एका तासात तब्बल १० हजार वेळा तितली क्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:38 AM2021-03-19T04:38:05+5:302021-03-19T04:38:05+5:30
सातारा : योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाव समावेश झालेल्या साताऱ्यातील जान्हवी इंगळे हिने रविवारी दुसऱ्यांदा अनोखा विक्रम केला. ...
सातारा : योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाव समावेश झालेल्या साताऱ्यातील जान्हवी इंगळे हिने रविवारी दुसऱ्यांदा अनोखा विक्रम केला. नऊवारी साडीमध्ये एका तासात तब्बल १० हजार वेळा तितली क्रिया तिने केली. या अनोख्य उपक्रमाबाबत कौतुक होत आहे.
साताऱ्यातील जान्हवी इंगळे या योगामध्ये नवनवे विक्रम करत आहेत. त्यातून निरोगी आरोग्याचा धडा देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून योग प्रकारातील तितली क्रिया म्हणजेच बटरफ्लाय हे एका तासात १० हजार वेळा केली. नऊवारी साडी परिधान करून या प्रकारातील योगा करणारी पहिली मुलगी ठरली असल्याचा त्याचा दावा आहे.
योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डसाठी दावा नोंद.. हा विश्वविक्रम महाराष्ट्रामधील पहिले साताऱ्याचे आयुर्वेदिक गार्डन श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज उद्यान येथे केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील काटकर, राजू गोडसे, माजी उपनगराध्यक्षा व मानव सुरक्षा संघ ह्युमन राईट जिल्हा अध्यक्ष दीपाली गोडसे आणि रुचिरा इंगळे, माया माने, आई भारती, वडील जयप्रकाश इंगळे, मधुरा, तन्वी यांचे सहकार्य लाभले.
त्यानंतर साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, माजी नगराध्यक्षा रंजना रावत आणि अश्विनी पुजारी यांनी कौतुक केले.
१८ जान्हवी इंगळे
साताऱ्यातील जान्हवी इंगळे यांनी नऊवारी साडीत एका तासात १० हजार वेळा तितली क्रिया केली.