Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत!

By प्रगती पाटील | Published: October 31, 2023 03:38 PM2023-10-31T15:38:19+5:302023-10-31T15:43:42+5:30

सातारा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि धार्मिक दृष्ट्या सृजनशील असलेल्या सातारा तालुक्यातील जीहे येथून मराठा आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी ...

By Jihekar's bhajan At the site of the Maratha movement Devotional atmosphere | Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत!

Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत!

सातारा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि धार्मिक दृष्ट्या सृजनशील असलेल्या सातारा तालुक्यातील जीहे येथून मराठा आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे आंदोलनस्थळावर जिहेकरांच्या भजनाने धार्मिक वातावरण तयार झाले.

सकाळी जिहे गावातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गाडीवर झेंडा आणि ग्रामस्थांच्या डोक्यावर टोपी परिधान केलेली ही पंधरा किलोमीटरची रॅली अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली. रोहित सावंत, गिरीश फडतरे, अमरसिंह फडतरे, विक्रमसिंह फडतरे, गौरव फडतरे, हेमंत सावंत, रामराव जाधव, केदार फडतरे, मुकेश फडतरे, बजरंग फडतरे, गणेश जाधव आदी ग्रामस्थ या रॅलीत सहभागी झाले होते.

जीहे भजनी मंडळाची कमाल 

जिहे येथून आलेल्या ह. भ. प. भजनी मंडळाने आंदोलन स्थळावरील वातावरणात भक्ती भाव पेरला. विठ्ठल नामाचा गजर करत आंदोलकांना प्रोत्साहन देणारी भजने सादर करून भजनी मंडळाने अनोखा माहोल तयार केला. 

सर्वधर्मसमभाव ही भावना जोपासून गेली अनेक दशके जिथे ग्रामस्थ एक दिलाने गावात राहिली आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावातील विविध जाती धर्मातील ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवत आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. - रोहित सावंत, जिहे ग्रामस्थ

Web Title: By Jihekar's bhajan At the site of the Maratha movement Devotional atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.