Satara: खोटा स्क्रीनशॉट पाठवला, इंदापूरच्या दोघांनी ३० लाखांचा जेसीबी नेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:36 PM2024-08-05T16:36:09+5:302024-08-05T16:37:25+5:30
सातारा : तीस लाखांचा जेसीबी खरेदी करत असल्याचे सांगून एनईएफटी स्क्रीनशाॅट बनावट पाठवून जेसीबी पैसे न देताच नेण्यात आला. ...
सातारा : तीस लाखांचा जेसीबी खरेदी करत असल्याचे सांगून एनईएफटी स्क्रीनशाॅट बनावट पाठवून जेसीबी पैसे न देताच नेण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात इंदापूरच्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अभिजित मोहन घोरपडे (रा. निमसाखर, ता. इंदापूर, जि. पुणे), सोहेल शाैकत शेख (रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
माजीद फारूख शेख (वय २७, रा.गुरुवार पेठ, सातारा) याचा जेसीबी खरेदीसाठी वरील संशयित साताऱ्यात आले. तीस लाखांचा व्यवहार ठरल्यानंतर संशयितांनी पैसे पाठविल्याचा एनईएफटी स्क्रीनशाॅट पाठविला. मात्र, तो बोगस असल्याचे माजीदच्या लक्षात आले. त्याने जेसीबी परत मागितला असता जेसीबी पुन्हा देणार नाही, असे सांगून पुन्हा गावात आलास, तर मारून टाकीन, तसेच जेसीबी पेटवून देण्याची त्यांनी धमकी दिली.