जिल्हा बँकेकडून म्हसवड उपजिल्हा रुग्णालयाला बायपॅप मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:42 AM2021-05-25T04:42:48+5:302021-05-25T04:42:48+5:30
म्हसवड : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ...
म्हसवड : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साधारण तीन लाख रुपये किमतीचे जिल्ह्यातील पहिले ‘बायपॅप मशीन’ म्हसवड उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर, व्यवस्थापक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जयवंत पवार, नोडल ऑफिसर डॉ. राजेंद्र मोडासे, विभागीय अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे, आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सदस्य युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, एल.के. सरतापे, राहुल मंगरुळे, प्रशांत दोशी, खंडेराव सावंत, संजय टाकणे, प्रीतम तिवाटणे, डॉ. राजेंद्र मोडासे, डॉ. राजेश शहा, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. शेळके मॅडम, डॉ. सावंत, डॉ. मुल्ला मॅडम, गणेश माने, सुहास भिवरे, अविनाश मासाळ, धनाजी भोसले आदी उपस्थित होते.
===Photopath===
240521\img_20210522_133753.jpg
===Caption===
जि. म. बँकेकडून जिल्ह्यातील पहिले 'बायपॅप मशीन म्हसवड DCHC ला भेट.