केबल उखडली अन् इंटरनेट सेवा पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:19+5:302021-07-30T04:41:19+5:30

सातारा : सातारा शहरात पाण्याच्या जलवाहिन्यांना लागणारी गळती हा अनेक वर्षांचा प्रश्न आहे. आता या गळती काढण्याच्या कामामुळे शहरातील ...

Cable disconnected and internet service shut down | केबल उखडली अन् इंटरनेट सेवा पडली बंद

केबल उखडली अन् इंटरनेट सेवा पडली बंद

googlenewsNext

सातारा : सातारा शहरात पाण्याच्या जलवाहिन्यांना लागणारी गळती हा अनेक वर्षांचा प्रश्न आहे. आता या गळती काढण्याच्या कामामुळे शहरातील इंटरनेट सेवाही बंद पडू लागली आहे. गुरुवारी येथील गुरुवार पेठेतील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडली होती.

गुरुवार पेठेत कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार आल्याने सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांपासून अदालतवाडा ते देवी चौक या मार्गावर गळती काढण्याचे काम हाती घेतले होते. या कामादरम्यान जेसीबीचे ब्लेड बीएसएनएलच्या केबलला लागल्याने नागरिकांचे दूरध्वनी व एअरसेल ही भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली. माध्यम यंत्रणा बंद पडल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा झाला. इंटरनेट सेवा ठप्प होऊन विलक्षण मनस्तापाला सामोरे जावे लागले.

काही नागरिकांनी या बिघाडाची खबर पोवई नाक्यावरील बीएसएनएल कार्यालयाच्या सेवा यंत्रणेला दिली. गुरुवारी सकाळी ही यंत्रणा दुरुस्तीसाठी हजर झाली. पालिकेने गळतीसाठी काढलेल्या चरीमुळे बीएसएनएलच्या केबलमध्ये पाणी जाऊन रिसेप्टर बंद पडल्याचे निदर्शनास आले. हा बिघाड तत्काळ दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्यात आली. सातारा पालिकेच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

फोटो नेम : २९जावेद

फोटो ओळ : सातारा येथील अदालतवाडा ते देवी चौक या मार्गावर सातारा पालिकेने गळती काढण्यासाठी चर खोदली आहे. (छाया : जावेद खान)

Web Title: Cable disconnected and internet service shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.