संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:02 AM2018-02-09T01:02:04+5:302018-02-09T01:02:04+5:30
कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले.
कºहाड : ‘बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न व बंद उद्योगामुळे भाजपविरोधात देशभर असंतोष आहे. नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले. काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले आणि भाजप सरकारने त्यांच्या कार्यकालात काय केले? याच्या चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा,’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
कºहाड येथील निवासस्थानी गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले आहेत. हे करताना संसदेचे पावित्र्यही त्यांनी जपले नाही. निवडणुकीचे राजकीय भाषण त्यांनी संसदेत केले. हा निव्वळ पोरकटपणा आहे. देशाच्या राजकीय इतिहासात असे घडलेले नाही. शेती उत्पादनाला हमी भाव नाही. बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करणार, हे सांगितले नाही.’
काँग्रेस-राष्ट्रवादी आता एकत्र
आगामी निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढेल. वरिष्ठ पातळीवर याबाबत सकारात्मक बैठका झाल्या आहेत. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढल्याने आमच्या ६९ टक्के मतांमध्ये विभागणी झाल्याने अवघी ३१ टक्के मते मिळालेला भाजप सत्तेत गेला.