कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’ची निवडणूक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:35+5:302021-05-26T04:38:35+5:30

कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जूनला होऊ घातलेली आहे. मात्र, ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ रद्द ...

Cancel the election of 'Krishna' against the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’ची निवडणूक रद्द करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’ची निवडणूक रद्द करा

Next

कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जूनला होऊ घातलेली आहे. मात्र, ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ रद्द करावी, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,आज आपण सर्वजण कोरोनासारख्या महामारीविरुद्ध लढा देत आहोत. साधारण मागीलवर्षी सुद्धा कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याहीवर्षी कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेले दीड ते दोन महिने झाले प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊन चालू आहे. लाॅकडाऊन असूनही कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

अशातच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आता नामनिर्देशन भरायची प्रक्रिया चालू झाली आहे. एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना अशातच कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. त्याचा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. निवडणूक लागली म्हणजे प्रचारसभा, मेळावे आलेच. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यातच कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र हे दोन जिल्ह्यांत विभागले आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांत निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या जीवावर उठून जर ही निवडणूक लढवणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील.

या निमित्ताने कारखान्याच्या शेतकरी सभासदांना जाहीर आव्हान करतो की, राजकीय पक्ष निवडणूक लढवून मोकळे होतील. कोरोनामुपळे आपले कुटुंब अडचणीत येईल त्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निवडणुकीवर बहिष्कार घाला. प्रशासनाच्यावतीने जोपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी सभासदांचा जीव धोक्यात घालू नये, असेही दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात साजिद मुल्ला यांनी म्हटले आहे.

Web Title: Cancel the election of 'Krishna' against the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.