Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत

By दीपक देशमुख | Published: October 3, 2023 03:36 PM2023-10-03T15:36:57+5:302023-10-03T15:39:20+5:30

आंदोलक आले हाफ पँट अन् पांढरा शर्ट परिधान करून, अनोख्या आंदोलनाने अधिकारी देखील अवाक

Cancel the decision to close schools with less than twenty marks immediately, Protest on behalf of the Republican Party of India (Athwale group) at the Collectorate in Satara | Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत

Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत

googlenewsNext

सातारा : कलेक्तल काका, आमच्या शाळा बंद कलू नका ना, असा बालहट्ट चक्क मोठया माणसांनी केला तर काय म्हणावे. परंतु, रिपाइंच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी असेच बोबडे बोल बोलत आणि उड्या मारतच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातच हे आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलकांनी खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी समक्ष निवेदन स्वीकारावे असा आग्रह धरला. जिल्हाधिकारी व्हीसीमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनी जिल्हाधकाऱ्यांच्या कक्षा समोरच ठिय्या मारला. काही वेळाने व्हीसी संपवून जिल्हाधिकारी जितेन्द्र डूडी आले. यानंतर  त्यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे की, आई-वडिलांनंतर दुसरे मातृत्व म्हणजे शिक्षण आहे. हे शिक्षण दत्तक देण्याच्या अर्थात विकण्याच्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय संविधान विरोधी असून सर्वसामान्य वंचित मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे. सरकारी शाळा चालवण्याची पात्रता राज्य सरकारची नाही तर मग सरकारचा काय उपयोग?  हे मातृत्व अबाधित ठेवण्यासाठी सरकारने संविधान विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनास सहभागी झाले होते.

सांग सांग एकनाथ.. शाळा टिकेल काय

अजितकाका, देवेंद्र काका, सातारचे शंभू काका आणि एकनाथ काका आदींनाही निवेदन देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी सांग सांग एकनाथ.. शाळा टिकेल काय, अशी कविता महिला कार्यकर्त्यांनी सादर केली.

Web Title: Cancel the decision to close schools with less than twenty marks immediately, Protest on behalf of the Republican Party of India (Athwale group) at the Collectorate in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.