कृष्णा कॅनॉल जलपर्णीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:34 AM2021-01-22T04:34:59+5:302021-01-22T04:34:59+5:30

कऱ्हाड शहरालगतच्या सैदापूर, चौंडेश्वरीनगर, हनुमाननगर, गोवारे या हद्दीमधून कॅनॉल पुढे जातो. अतिवृष्टीत कॅनॉलचा बराच भाग खचला आहे. या परिसरातील ...

In the canopy of Krishna Canal Jalparni | कृष्णा कॅनॉल जलपर्णीच्या विळख्यात

कृष्णा कॅनॉल जलपर्णीच्या विळख्यात

Next

कऱ्हाड शहरालगतच्या सैदापूर, चौंडेश्वरीनगर, हनुमाननगर, गोवारे या हद्दीमधून कॅनॉल पुढे जातो. अतिवृष्टीत कॅनॉलचा बराच भाग खचला आहे. या परिसरातील काही भागांमध्ये तातडीचे उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधली. मात्र, चौंडेश्वरीनगर येथे मोठ्या प्रमाणात कॅनॉल खचला आहे. पाटबंधारे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. चौंडेश्वरीनगर, गजानन सोसायटी, गोवारे, हनुमाननगर या ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना कॅनॉललगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करावा लागतो. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थही याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात. मात्र, कॅनॉलचा भाग काही ठिकाणी खचल्याने दुचाकी घसरून अपघात घडण्याची भीती आहे. यात एखादा विद्यार्थी अथवा ग्रामस्थ दगावला तर याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कृष्णा कॅनॉल ते गोवारे हद्दीपर्यंत कॅनॉलमध्ये जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालून जलपर्णी काढून कॅनॉलची स्वच्छता करावी. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जलपर्णी बैलगाडीमध्ये भरून कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात टाकणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे.

Web Title: In the canopy of Krishna Canal Jalparni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.