राजधानी सज्ज !

By admin | Published: October 3, 2016 12:29 AM2016-10-03T00:29:30+5:302016-10-03T00:29:30+5:30

पाचवडच्या मुख्य चौकालाच शिवाजी महाराजांचे नाव

The capital is ready! | राजधानी सज्ज !

राजधानी सज्ज !

Next

सातारा : गेल्या एक महिन्यापासून गाजत असलेला दिवस अखेर जवळ आला. होय... ३ आॅक्टोबर. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपतींच्या राजधानीतील ‘मराठा महामोर्चा’च्या आदल्या दिवशी साताऱ्यात तयारी पूर्ण झाली. वातावरण निर्मितीसाठी भगवे झेंडे घेऊन गल्लीबोळापासून डोंगर कपारीपर्यंत मोठ्या उत्साहानं तरुणाई फिरत होती तर दुसरीकडे लाखोंचा जमाव साताऱ्यात आल्यानंतर कशा पद्धतीनं सज्ज असलं पाहिजे, याचं नियोजन करण्यात पोलिस खातंही पूर्णपणे गुंतलं होतं.


गावोगावच्या ग्रामसभांमध्ये फक्त महामोर्चाचे ठराव!
गाव बंद ठेवण्याचा निर्धार : गावच्या सुरक्षेवरही सर्वव्यापी चर्चा
सातारा : महात्मा गांधी जयंतीदिनी गावोगावी ग्रामसभा घेतल्या जातात. साताऱ्यात सोमवारी मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात संपूर्ण गावाने सहभागी होण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.
शंभर टक्के गाव बंद ठेवून महामोर्चात सहभाग
वाठार स्टेशन : साताऱ्यातील महामोर्चा यशस्वी करण्यासाठी शंभर टक्के गाव बंद ठेवून लोकांनी या महामोर्चात सहभागी व्हावं. यासाठी रविवारच्या प्रत्येक गावातील ग्रामसभेतून ठरावांना मंजुरी घेण्यात आली. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच गावांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशा मागण्या केल्या.
वाठार स्टेशन येथे सरपंच महेश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत मराठा आरक्षणबाबत ठराव करण्यात आला. यावेळी शेकडो ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देऊर येथे सरपंच नीलिमा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत मराठा आरक्षण ठराव मंजूर करण्यात आला. यासह पिंपोडे बुद्रुक, वाघोली, तडवळे, पिंपोडे खुर्द, दहिगाव, अंबवडे, रेवडी, पळशी, गुजरवाडी, बिचुकले, तळिये, विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, बनवडी, आरबवाडी, दुधनवाडी, आसनगाव, शहापूर, अनपटवाडी गावांमध्येही ग्रामसभेत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. चर्चेत शेकडो ग्रामस्थ, युवक, महिलांनी सहभाग घेतला. 

पाचवड : साताऱ्यात निघणाऱ्या महामोर्चासाठी गावोगावी, वाडी-वस्त्यांवर मराठा बांधवांच्या बैठका झाल्या. महामोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचा ठराव पाचवडसह परिसरात रविवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. दरम्यान, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौकालाच शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. पाचवड, अमृतवाडी, चिंदवली, उडतारे, खडकी, कळंभे, आसले, कडेगाव, व्याजवाडी, अनवडी, चांदवडी, भिवडी, जांब, निकमवाडीसह परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये मराठा महामोर्चात सहभाग व मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल ठराव करण्यात आला.
 

Web Title: The capital is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.