Satara: विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात एक ठार, सात जण जखमी

By दीपक शिंदे | Published: June 29, 2023 02:19 PM2023-06-29T14:19:07+5:302023-06-29T14:23:14+5:30

ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

Car accident while overtaking, one killed, seven injured, Accident near Lodhawade in Satara | Satara: विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात एक ठार, सात जण जखमी

Satara: विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात एक ठार, सात जण जखमी

googlenewsNext

म्हसवड : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या गाडीला लोधवडेनजीक सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण ठार, तर ७ जण जखमी झाले. कल्याण भोसले असे मृताचे नाव आहे. जखमी झालेले सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीचे रहिवासी आहेत. घटनास्थळी दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे यांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्ताने कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पैलवान प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे कारने (एमएच ११ बीएच ०८९६) पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. गाडीतून चालक कल्याण भोसले (वय ४५) , अण्णा गाढवे (४२), पपू भिसे (४०), दादासो थोरात (४२), सागर भोसले, विजय माने (४५), श्रीमंत पवार (५०), रुद्र भोसले (सर्व रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) हे आठ जण प्रवास करत होते. गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाट्यानजीक त्यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावरून गाडी उंच उडाली अन थेट चार वेळा पलटी होत एका रानात जाऊन पडली. 

चिमुकला देत होता जखमींना धीर 

अपघाताची माहिती समजताच लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी येऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. रुद्र भोसले (वय १३) हा देखील गाडीत होता. तो सर्वांना धीर देत होता. जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून पुढील उपचारासाठी साताऱ्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सपोनि. अक्षय सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. 

Web Title: Car accident while overtaking, one killed, seven injured, Accident near Lodhawade in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.