Satara: भरधाव कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार; शिवज्योत आणण्यासाठी निघाले असता घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:28 PM2024-02-19T12:28:53+5:302024-02-19T12:29:39+5:30

रशिद शेख  औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे भरधाव कार व दुचाकीच्या भीषण अपघात एक जण ठार झाला. अपघातात ...

car-bicycle accident, one killed in Satara, An unfortunate incident happened while going to bring Shivjyot | Satara: भरधाव कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार; शिवज्योत आणण्यासाठी निघाले असता घडली दुर्दैवी घटना

Satara: भरधाव कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार; शिवज्योत आणण्यासाठी निघाले असता घडली दुर्दैवी घटना

रशिद शेख 

औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे भरधाव कार व दुचाकीच्या भीषण अपघात एक जण ठार झाला. अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीवर असणारे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कराड येथे हलविले.

उपचारादरम्यान धनंजय शिंदे (वय-२५ रा. सूर्याचीवाडी ता. खटाव) याचा मृत्यू झाला. तर किरण जाधव (रा. सूर्याचीवाडी) हा गंभीर जखमी झाला. चारचाकी वाहनातील जखमीची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र चारचाकी दहिवडी ता. माण येथील असल्याची माहिती मिळाली. काल, रविवारी (दि.१८) हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, सूर्याचीवाडी ता. खटाव येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून सज्जनगड येथे निघाले होते. दरम्यान गोपूज -औंध रोडवर राजपथ इन्फ्रा कपंनीच्या खडीच्या डेपोनजीक औंधकडून येणारी चारचाकी क्रमांक (एम. एच ११ डी. ए.००७५) यांच्यात भीषण धडक झाली. यामध्ये दुचाकीची पुढील बाजू तुटून दुसरीकडे पडली तर चारचाकी गाडी पलटी झाली. यावेळी सूर्याचीवाडी येथून पाठीमागून येणाऱ्या पीक-अप मधून दुचाकीस्वारांना उपचारासाठी हलविण्यात आले. तर चारचाकी गाडीतील जखमींना नागरिकांनी बाहेर काढले.

हा अपघात एवढा भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. औंध पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.

Web Title: car-bicycle accident, one killed in Satara, An unfortunate incident happened while going to bring Shivjyot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.