नागझरी घाटात कार पेटली

By admin | Published: March 5, 2017 11:13 PM2017-03-05T23:13:20+5:302017-03-05T23:13:20+5:30

प्रवासी सोडून जाताना अपघात : चालत्या गाडीतून उडी घेतल्याने चालक बचावला

The car in the Nagzari Ghat was opened | नागझरी घाटात कार पेटली

नागझरी घाटात कार पेटली

Next



रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पुसेसावळी-नागझरी दरम्यान असलेल्या घाटातून येत असलेल्या एका कारमधून रविवारी सकाळी अचानक धूर येऊ लागला. धूर आणि जाळ दिसताच चालक सचिन शिंदे यांनी चालत्या गाडीतून उडी घेतली. त्यानंतर काही क्षणात कार जळून खाक झाली. शिंदे यांनी प्रसंगावधान दाखविल्याने ते थोडक्यात बचावले.
रहिमतपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन रामचंद्र शिंदे (वय ३५, रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव) हे रविवारी (दि. ५) लोणंद येथून भाडे घेऊन पुसेसावळी येथे सोडायला गेले होते. प्रवासी पुसेसावळी येथे सोडून ते पुन्हा कण्हेरखेड या त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी कार (एमएच १४ सीएक्स ६११३) मध्ये सचिन शिंदे हे एकटेच होते.
त्यांची कार सकाळी साडेनऊच्या सुमारास नागझरी घाटात आली असता अचानक धूर येऊ लागला. धूर कोठून येत आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता जाळ दिसू लागला. यावेळी शिंदे यांनी चालत्या कारमधून उडी घेतल्याने ते वाचले. त्यानंतर त्यांनी कार रस्त्यावरच सोडून माळरानात पळ काढला. प्रवाशांना यापूर्वी सोडले असल्याने मोठा अनर्थ टळला. शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वीच नवीन कार खरेदी केली होती. आगीच्या दुर्घटनेमध्ये सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या घटनेची रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार एस. जे. शिंदे तपास करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The car in the Nagzari Ghat was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.