‘कृष्णा’त ‘शाॅकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी"तंत्राद्वारे ह्रदयशस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:06+5:302021-07-10T04:27:06+5:30

म्हासोली (ता. कराड) येथील रहिवासी अनंत कुलकर्णी (वय ८६) यांनी छातीत दुखू लागल्याने कराडमधील एका खासगी रुग्णालयात आपली तब्येत ...

Cardiac surgery using shockwave intravascular balloon lithotripsy in Krishna | ‘कृष्णा’त ‘शाॅकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी"तंत्राद्वारे ह्रदयशस्त्रक्रिया

‘कृष्णा’त ‘शाॅकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी"तंत्राद्वारे ह्रदयशस्त्रक्रिया

Next

म्हासोली (ता. कराड) येथील रहिवासी अनंत कुलकर्णी (वय ८६) यांनी छातीत दुखू लागल्याने कराडमधील एका खासगी रुग्णालयात आपली तब्येत दाखविली. त्या वेळी त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. या ठिकाणी कुलकर्णी यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांची भेट घेतली. त्या ठिकाणी त्यांच्या हृदयविकारासंदर्भातील चाचण्या केल्या असता, त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये कॅल्शियमयुक्त प्लाक असल्याचे लक्षात आले व त्यांना बायपास शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान करण्यात आले. पण त्यांचे वय ८६ वर्षे असल्याने, तसेच या वयात मधुमेहासारख्या व्याधी जडल्याने हृदयाची आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता कमी झालेली असते. अशा वेळी बायपास करणे धोक्याचे असल्याने, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून कुलकर्णी यांच्यावर ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. विजयसिंह पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून करण्यात आलेली ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच हृदयशस्त्रक्रिया ठरली आहे.

याबाबत बोलताना डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच उत्तम कॅथलॅब, चांगले सहकारी व इतर कोणतीही अत्यावश्यक स्थिती निर्माण झाल्यास लागणाऱ्या सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये अशा सर्व सुविधा एकाच छताखाली असल्याने, सातारा जिल्ह्यात प्रथमच आम्ही ही अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करू शकलो. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित शेळके, डॉ. रमेश कावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोट

कोविड–१९ च्या काळात कृष्णा हॉस्पिटलमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टर्स, जागतिक दर्जाच्या इन्फेक्शन कंट्रोल पद्धती, स्टाफला दिले जाणारे अद्ययावत ट्रेनिंग, अत्याधुनिक उपकरणे व उपचारपद्धती यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये या अवघड शस्त्रक्रिया सहज पार पाडणे शक्य होते.

डाॅ. सुरेश भोसले

अध्यक्ष, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट

फोटो :

‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णासमवेत कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स व त्यांचे सहकारी.

Web Title: Cardiac surgery using shockwave intravascular balloon lithotripsy in Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.