पार्किंगमधला कॅरम क्लब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:57+5:302021-05-30T04:29:57+5:30

सातारा शहरामध्ये शनिवार पेठेत ज्ञानेश्वर भवन अपार्टमेंट आहे. शासनाने दिलेले नियम पाळत येथील रहिवासी महत्त्वाचे काम वगळता कुठेही गेले ...

Carrom club in the parking lot! | पार्किंगमधला कॅरम क्लब!

पार्किंगमधला कॅरम क्लब!

Next

सातारा शहरामध्ये शनिवार पेठेत ज्ञानेश्वर भवन अपार्टमेंट आहे. शासनाने दिलेले नियम पाळत येथील रहिवासी महत्त्वाचे काम वगळता कुठेही गेले नाहीत. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन केले. तरीदेखील मनोरंजनाची साधने सोबत असतील, तर घरात बसून राहणं हे ओझं वाटत नाही. मोठी माणसं बाहेर जाऊ शकतात; पण शाळकरी मुलांचा कोंडमारा लक्षात घेऊन या अपार्टमेंटमधील सदस्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला.

मुलांमध्ये एकाग्रता वाढीला लागावी, त्यांच्यात खिलाडूवृत्ती तयार व्हावी म्हणून या सदस्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. एकमेकांच्या घरात जाताना विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच लोकांच्या प्रायव्हसीचादेखील भंग होतो. हे लक्षात घेऊन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येच स्वच्छता केली. घराबाहेर पडून मैदानात जाणे शक्य नाही, त्यामुळे या पार्किंगमध्ये एक अनोखा कॅरम क्लब सुरू करण्यात आला. अपार्टमेंटमध्ये मोजकेच लोक राहत असल्याने त्यांना मनोरंजनाचे चांगले साधन मिळाले.

कुठल्याही कॅरम क्लबमध्ये टेबलवर कॅरम ठेवलेला असतो, तर बाजूने चार खुर्च्या असतात आणि मध्यभागी तबकडी सोडलेली असते, यामध्ये कॅरम गरम करण्यासाठी बल असतो तसेच खेळणाऱ्यांचे लक्ष हे खेळावरच लागून राहते. अगदी त्याच पद्धतीने परंतु टाकाऊ वस्तूंपासून व्यवस्था करण्यात आली. कॅरम ठेवण्यासाठी एक छोटा लाकडी बॉक्स तयार करण्यात आला. तसेच अपार्टमेंटमधील स्विच मधून लाईट घेऊन एक बल्ब आणि तबकडी खाली सोडण्यात आली. खेळण्यापूर्वी ती लावायची, खेळ संपल्यानंतर काढून ठेवायची, असा नित्यक्रम सुरू झाला.

घरातील महिला वर्ग, पुरुष वर्ग आपले काम संपल्यानंतर या खेळाचा आस्वाद घेऊ लागले. मुलेही तासनतास टीव्हीपुढे बसण्यापेक्षा कॅरम खेळू लागली. कॅरम हा बुद्धिचातुर्य, चलाखी, मानसिक संतुलन आणि बोटांची हालचाल याच्याशी निगडित असल्याने मुलांची एकाग्रता वाढीला लागली. महिला व पुरुषांच्या कामामुळे येणारा ताणदेखील दूर झाला. ठराविक वेळ काढून अशा पद्धतीने घरात कोंडून न घेता मनोरंजन करण्याचा मार्ग ज्ञानेश्वर भवन अपार्टमेंटमधील सदस्यांनी शोधून काढला.

पार्किंगमध्येच पंख्याची सुविधा..

इमारतीचे पार्किंग म्हटले ते धूळ, टाकाऊ वस्तूंचा भरणा आणि त्यातच खेटून लावलेल्या गाड्या असे चित्र अनेक इमारतींमध्ये पाहायला मिळते. मात्र ज्ञानेश्वर भवनच्या पार्किंगमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिले आहे. फावल्या वेळेत त्याठिकाणी सतरंजी टाकून सुद्धा गप्पा मारता येतात. एवढा उन्हाळा तीव्र असताना पार्किंगमध्ये पंख्याची सोय असल्याने उकाडा कोणालाही जाणवला नाही.

- सागर गुजर

फोटो आहे

Web Title: Carrom club in the parking lot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.