कारची ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक, ५ वर्षाच्या मुलासह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 01:57 PM2021-07-14T13:57:05+5:302021-07-14T13:59:56+5:30

: सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामूळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

The car's tractor hit the trolley from behind, injuring three people, including a 5-year-old boy | कारची ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक, ५ वर्षाच्या मुलासह तिघे जखमी

सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक झाली. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामूळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया- माणिक डोंगरे)

googlenewsNext
ठळक मुद्देकारची ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक, ५ वर्षाच्या मुलासह तिघे जखमी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मलकापूर : सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामूळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

योगेश अशोक बारटक्के ( वय ३५), भारती अशोक बारटक्के (वय ५५ ), निरज योगेश बारटक्के (वय ५ सर्व रा. मंगळवार पेठ सातारा) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

अपघातस्थळावरून व पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ट्रँक्टर (क्रमांक एम एच ११ यु ०८२३ ) हा ट्रॉली क्रमांक ( एम एच ११ आर ९६५३ व ९६५४) घेऊन कराडकडे जात होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत आले असता, सातारा येथून कोल्हापूर दिशेने जात असलेल्या कार ( क्रमांक एम एच १२ ई टी ३४३७) च्या चालकाचा ट्रँक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटल्याने कारची ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसली.

या अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, सिकंदर उघडे, यांच्यासह महामार्ग पोलिस कर्मचारी व कराड शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव, खलील इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अपघातातील जखमींना १०८ रूग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात पाठवून दिले. यावेळी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच आसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक कांही काळ उपमार्गावरून वळवण्यात आली होती. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमीला रूग्णालयात पाठवल्यानंतर महामार्ग देभालचे व महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केला.


 

Web Title: The car's tractor hit the trolley from behind, injuring three people, including a 5-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.