कास पठार यंदा ‘लॉकडाऊन’च! ३० ते ३५ प्रकारची फुले फुलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:47 AM2020-09-20T05:47:15+5:302020-09-20T05:47:25+5:30

प्रदूषण नसल्याने जैवविविधता खुलली

Cas Plateau is locked down this year! | कास पठार यंदा ‘लॉकडाऊन’च! ३० ते ३५ प्रकारची फुले फुलली

कास पठार यंदा ‘लॉकडाऊन’च! ३० ते ३५ प्रकारची फुले फुलली

googlenewsNext

प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विविधरंगी रानफुलांचा अलौकिक आविष्कार असलेला ‘कास पठार’ सध्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. येथील ३० ते ३५ प्रकारच्या फुलांचा हंगाम आणखी महिनाभर चालणार आहे. तथापि, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचे वर्ष हे पठार पर्यटकांसाठी ‘लॉकडाऊन’च राहणार आहे. दरवर्षी दीड महिन्याच्या काळात दोन लाख पर्यटक येथे येतात. यंदा ही वर्दळ नसल्याने येथील जैवविविधता फुलली आहे.
कास पठारावरील फुलांचा मोसम बहरात आहे. १ सप्टेंबरला कासचा पर्यटन हंगाम सुरू होतो. तथापि, कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा हंगाम सुरू करण्याला लाल निशाण दाखवले आहे. त्यामुळे कास कार्यकारी समितीने पठारावरील पर्यटकांचे मार्ग बंदच ठेवले. पठारावरील पायवाटा व कुमोदिनी तळ्याकडे जाणारा राजमार्गही बंद ठेवला आहे.

पर्यावरणासाठी सुनियंत्रित पर्यटनाची गरज
भविष्यात प्रदूषण न करणाऱ्या, अपारंपरिक ऊर्जेवरील वाहनांचा वापर पठार व परिसरात करावा किंवा येणाºया पर्यटकांची वाहने साताºयात थांबवून बसने पठारावर लोकांना नेता येईल. तेथे पायी किंवा सायकलचा वापर वाढवता येईल.
पर्यटकांचे लोंढे थांबवायचे याचा अर्थ पर्यटन बंद नव्हे, तर नियंत्रित पर्यटन असा आहे. पठाराच्या धारण क्षमतेएवढेच पर्यटकांना पठारावर सोडता येईल.
अशा उपायांमुळे लॉकडाऊन काळात खुललेली पठाराची जैवविविधता पुढे दरवर्षी कायम राखता येईल, असे आग्रही मत तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले.


पर्यटकांना दुरूनच दर्शन
गेल्या ६ महिन्यांत लॉकडाऊनला कंटाळलेले पर्यटक पठारावर तुरळक प्रमाणात, ‘वीकेंड’ला येत आहेत. मुख्य रस्त्यावरून, दुरूनच फुलांचे दर्शन घेऊन परतावे लागत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगावहून कासला फिरायला आलेले रमेश बनसोडे म्हणाले, येथे निसर्गाची मुक्त उधळण आहे. त्यामुळे एवढ्या लांबून मित्रांसोबत आलो. पठारावर वातावरणही चांगले आहे; परंतु पर्यटकांना प्रवेश बंद असल्याने आम्हाला रस्त्यावरून परत जावे लागत असल्याने आमचा भ्रमनिरास झाला.


कासचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी सांगितले की, निळ्या-पांढºया रंगाची सीतेची आसवं, पांढºया रंगाची गेंद, तुतारी, चवर (रानहळद), गवती दवबिंदू, नीलिमा, अबोली, सोनकी, महाकाली, आभाळी, नभाळी आदी ३० ते ३५ प्रकारची फुले पाहायला मिळत आहेत.
निळी मोठी सोनकी (अ‍ॅडेनून) हे फूल पठारावर फुलल्यानंतर फुलांचा हंगाम ७० टक्केसंपल्याचे स्थानिक लोक मानतात.
अद्याप हे फूल पठारावर दृष्टीस पडले नाही. त्यामुळे फुलांचा हंगाम आणखी महिनाभर चालेल, असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Cas Plateau is locked down this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.