डोंगरातील गुहेवरून कोसळतोय धबधबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:57 PM2017-07-18T13:57:00+5:302017-07-18T13:57:00+5:30
पर्यटकांचे आकर्षण : तोंडोशीत निसगार्चा अद्भूत आविष्कार
आॅनलाईन लोकमत
तारळे (जि. सातारा), दि. १८ : तोंडोशी, ता. पाटण येथील रामघळ डोंगरावरून पडणारे दोन धबधबे सध्या पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. निसर्गाच्या या अद्भुत देणगीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हाभरातून पर्यटक येथे भेट देत आहेत. राज्यातील सात प्रमुख घळींमध्ये येथील रामघळीचा उल्लेख केला जात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
तारळे गावापासून सुमारे बारा किलोमिटर अंतरावर तारळी धरणालगत तोंडोशी गाव आहे. या गावापासुन सुमारे एक किलोमिटरवर दक्षिणेला डोंगररांगांमध्ये रामघळ आहे. अत्यंत प्रेक्षणीय अशी ही जागा असून याठिकाणी समर्थांचे वास्तव्य होते, असे सांगीतले जाते.
पुर्णपणे दुर्लक्षित असलेली ही रामघळ गत काही वषार्पासुन पर्यटकांचे आकर्षण बनली आहे. तारळी धरणाकडे आलेले पर्यटक आवर्जुन याठिकाणी भेट देतात. येथील विलोभनिय निसगार्चा आस्वाद घेतात.
रामघळीकडे जाण्यासाठी काही वषार्पासून ग्रामस्थ श्रमदानातून रस्ता करीत आहेत. सध्या या रस्त्याचे काम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे. डोंगरात अर्धा किलोमिटरपर्यंत वाहन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पर्यटकांना चालतच जावे लागते.
रामघळीवरून कोसळणारे दोन्ही धबधबे लांबूनच दृष्टीस पडतात. त्यामुळे त्याठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांमध्ये आतुरता निर्माण होते. हे धबधबे पर्यटकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतात. उत्तराभिमुख रामघळीमध्ये प्रभु राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या आकर्षक मुर्ती आहेत. तसेच पश्चिममुखी हनुमानाची दगडी मुर्ती असून स्वयंभू शिवलिंगही आहे.
गगनगिरी महाराजांचे शिष्य राजेंद्रगिरी यांचे या गुहेत वास्तव्य आहे. रामनवमी, गुरूपौर्णिमा व इतर धार्मिक उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. रामघळीवरून पडणारे दोन नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. इतर धबधब्यांप्रमाणे पडणारे पाणी धोकादायक नसल्याने पर्यटक येथे आवर्जुन भेट देताना दिसत आहेत.
रामघळ व त्यावरून कोसळणारे दोन धबधबे आकर्षक असुनही रहदारीअभावी ते दुर्लक्षित राहिले होते. काही वषार्पासून ग्रामस्थांनी रहदारीसाठी रस्ता बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पर्यटक आता येथे भेटी देऊ लागले आहेत. कितीही तीव्र दुष्काळ असला तरी रामघळीवरून कोसळणाऱ्या धबधब्यातून थोड्या प्रमाणात का होईना, पाणी वाहत असते.
- मारूती भोसले
सरपंच, तोंडोशी