कास १५ मे पर्यंत पूर्णत्वास येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:39+5:302021-02-15T04:34:39+5:30

सातारा : सातारा शहराचा वाढता विस्तार पाहता कास धरणाचे काम येत्या १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. धरण ...

The case will be completed by May 15 | कास १५ मे पर्यंत पूर्णत्वास येईल

कास १५ मे पर्यंत पूर्णत्वास येईल

Next

सातारा : सातारा शहराचा वाढता विस्तार पाहता कास धरणाचे काम येत्या १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. धरण उंचीमुळे हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येत्या काही वर्षांत कास परिसर युनेस्कोच्या निकषाप्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

खा. उदयनराजे यांनी रविवारी सकाळी कास धरण विस्तारीकरणाच्या कामाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अ‍ॅड. दत्ता बनकर, बांधकाम सभापती सिद्धी पवार, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कास धरणाचे काम जवळपास ८० टक्के झाले आहे. धरण मार्गी लागल्यानंतर त्यात अर्धा टीएमसी पाणीसाठा होणार आहे. सध्या सांडव्यांच्या भिंतीच्या मजबुतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी कास पठारावरून तलावाकडे येणारा रस्ता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात येणार असून, बामणोलीकडे जाणारी वाहने एकीवकडून जातील असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या कामाची सर्व माहिती घेऊन खा. उदयनराजे म्हणाले, कास हा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सातारा विकास आघाडीने आपला वचननामा पूर्ण केला असून, धरण आणि पुनर्वसन ही दोन्ही कामे समांतरपणे सुरू राहणार आहेत. कास धरणाची सर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण होतील.

(चौकट)

मूलभूत सुविधा देऊ

विविध मागण्यांसाठी कास धरणाच्या भिंतीवर आंदोलन करणाºया ग्रामस्थांनी खा. उदयनराजे यांची भेट घेतली. कास गावठाणासह, स्मशानभूमी मंदिर इतर पायाभूत सुविधा, गावालगत पठारावरून जाण्यासाठी नवा रस्ता, आदी मूलभूत प्रश्नांबाबत त्यांनी खा. उदयनराजे यांच्याशी चर्चा केली. पायाभूत सुविधांच्या सर्व मागण्या मान्य करून पठारावरून येणाºया रस्त्यासाठी वन विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

(चौकट)

झोपडपट्टी मुक्त शहराचे समाधान

सातारा पालिकेच्या वतीने माजगावर माळ येथे पंतप्रधान घरकुल योजना साकारली जात असून, येथे तब्बल दोन हजार घरकुले असणार आहेत. या जागेची खा. उदयनराजे यांनी पाहणी केली. वीस वर्षांपूर्वी कचरा कुंडी व झोपडपट्टीमुक्त शहर अशी घोषणा आम्ही केली होती. शहर कचरा कुंडी मुक्त झाले आहे आणि सातारा झोपडपट्टी मुक्त होत आहे. याचे समाधान असल्याचे खा. उदयनराजे म्हणाले.

फोटो : १४ कास धरण पाहणी

खा. उदयनराजे भोसले यांनी रविवारी सकाळी कास धरणाला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मनोज शेंडे, अ‍ॅड. दत्ता बनकर, अनिता घोरपडे, सिता हादगे आदी उपस्थित होते. (छाया : सचिन काकडे)

Web Title: The case will be completed by May 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.