कास, बामणोलीला कारळ्याच्या फुलांनी शिवार बहरलं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:46 PM2017-10-05T12:46:44+5:302017-10-05T12:51:00+5:30
कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असतानाच आता कारळ्यांच्या फुलांनी शिवार बहरल्याचं नयनरम्य दृष्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सातारा,5 : कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असतानाच आता कारळ्यांच्या फुलांनी शिवार बहरल्याचं नयनरम्य दृष्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू आहे. हा फुलांचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात असतानाच आता कास आणि बामणोली परिसरात कारळ्याच्या फुलांनी शेती बहरली आहे. संपूर्ण शेतीमध्ये पिवळी फुले पाहायला मिळत असल्यामुळे हे नयनरम्य दृष्य पाहताना डोळ्यांना अल्हाहदायक वाटत आहे.
ही फुले पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली असून,आपल्या मोबाईलमध्ये पिवळ्या फुलांनी बहरलेल्या शेतीच्या फुलांचे छायाचित्र कैद करत आहेत. विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
दोन दिवसांपूर्वी कासला जाणाºया घाटामध्ये रस्ता खचला असल्यामुळे सध्या पर्यटकांना कासला प्रवेश दिला जात नाही. महाबळेश्वर, मेढा मार्गे पर्यटक या ठिकाणी भेटी देत आहेत.