कास पुष्प पठाराला वेध बहरण्याचे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:53 PM2017-08-03T14:53:48+5:302017-08-03T14:56:26+5:30

पेट्री (सातारा) : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पुष्प पठाराला बहरण्याचे वेध लागले आहेत. पठारावर सध्या तृण, कंद, वेली, आर्किड या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे कोसळत असल्याने हौसी पर्यटकांना निसर्गाचा नजराणा अनुभवास मिळत आहे.

Cass flower Plateau thrive ..! | कास पुष्प पठाराला वेध बहरण्याचे..!

कास पुष्प पठाराला वेध बहरण्याचे..!

Next
ठळक मुद्दे मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधब्यांचाही नजराणा तृण, कंद, वेली, आर्किड फुलांच्या हंगामास प्रारंभ पर्यटकांचे पावले वळण्यास सुरूवात


पेट्री (सातारा) : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पुष्प पठाराला बहरण्याचे वेध लागले आहेत. पठारावर सध्या तृण, कंद, वेली, आर्किड या फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मार्गात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे कोसळत असल्याने हौसी पर्यटकांना निसर्गाचा नजराणा अनुभवास मिळत आहे.


आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सर्वसाधारणपणे सप्टेबर, आॅक्टोबरमध्ये असतो. परंतु, आत्तापासून काही फुले दिसू लागली आहे. कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसगार्चा मनसोक्त आनंद घेत आहेत. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी कास पठार परिसरात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसत आहे.


पठारावर चवर, टूथब्रश, कापरू, कंद, पाचगणी आमरी, भुईचक्र आदी फुले तुरळक प्रमाणात उमलण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यातून फुलांचा हंगाम सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.
या पठाराचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जून ते आॅक्टोबर या कालावधीत तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना आकर्षक अशा निळया, जांभळ्या, लाल, पांढºया रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. पठारावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो.


सध्या पांढºया रंगाची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने तसेच चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाचा आनंद  घेत आहेत.

येथे याल तर हे पहाल


पंद (पिंडा कोंकणांसीस)
जमिनीत असणाºया कंदापासून ही वनस्पती उगवते. गोल बटाट्यासारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची पांढºया रंगाची फुले येतात. रानडुक्कर, सायाळ आदी तृणभक्षी प्राणी ही फुले खातात.

आषाढ बाहुली आमरी
(हबेनारीया ग्रँडी फलोरीफलोरमीस)
ही वनस्पती जांभ्या खडकात मातीच्या भागात उगवते. याची पाने लहान आकाराची असतात. ती जमिनीलगत असतात. त्यावर देठ असून त्यामध्ये दोन ते तीन फुले येतात. पांढºया रंगांच्या या फुलांचा आकार बाहुलीसारखा दिसतो.

चवर (हिच्चीनीया कावलीना)


आले वर्गातील ही वनस्पती सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये दिसते. जमिनीत  हळद किंवा आलेसारखे आकाराचे कंद दिसून येतात. याच कंदातून पठारावर पांढºया रंगांची फुले उमलतात. यास चवर किंवा चवेटा म्हणतात. पाने करदळीच्या पानांसारखी लांबट असतात.

Web Title: Cass flower Plateau thrive ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.