पशुखाद्याचे दर भडकल्याने पशुपालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:32+5:302021-05-30T04:30:32+5:30

सिद्धार्थ सरतापे वरकुटे-मलवडी : दिवसोंदिवस राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असून, लाॅकडाऊनच्या भीतीने व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे दर पाडले आहेत. याचा ...

Cattle breeders in trouble due to skyrocketing animal feed prices | पशुखाद्याचे दर भडकल्याने पशुपालक अडचणीत

पशुखाद्याचे दर भडकल्याने पशुपालक अडचणीत

Next

सिद्धार्थ सरतापे

वरकुटे-मलवडी : दिवसोंदिवस राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असून, लाॅकडाऊनच्या भीतीने व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे दर पाडले आहेत. याचा परिणाम म्हणून ऐन उन्हाळ्यात दुधाची दरवाढ थांबली आहे. याउलट पशुखाद्याच्या दराचा भडका उडाल्याने पशुपालक संकटात सापडले आहेत.

कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडल्यामुळे याचा फटका सर्वच वर्गांना बसतो आहे. गेल्या दीड वर्षापासून महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील करून ठेवले आहे. त्यातच पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुपालन करणारे शेतकरीही अडचणीत आले आहेत. या परिस्थितीत माण तालुक्यातील दूध डेअरींवर दुधाला लिटरमागे केवळ २३ ते २५ रुपये दर मिळत आहे. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी करायचं काय? असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. माण तालुक्यात सद्य:स्थितीला दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याने, कोरोनाचे संकट दूध व्यवसायाला मारक ठरत आहे.

गेल्या वर्षी दुधाच्या दरात वाढ होऊन उत्पादकांना दिलासा तरी मिळाला होता. मात्र या वर्षी कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेने दुग्धव्यवसाय करणाऱ्यांची मोठी हानी झाली आहे. गतवर्षीचे कोरोना संकट दूर होऊन पुन्हा दूध व्यवसायात आशादायी चित्र निर्माण होऊ लागले होते. मात्र या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाने दुधात मिठाचा खडा टाकत या व्यवसायाला पुन्हा ब्रेक लावण्याचे काम केले आहे. कोरोना संकटाने पशुधन मोठ्या प्रमाणावर घटल्याने, दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा उलट परिणाम होऊन दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी वाढली होती. मात्र पुन्हा सरकी पेंड, खपरी पेंड, ढेप, मक्काचुनी व इतर पशुखाद्यांचे भाव वाढल्याने, सध्या दुधाला मिळणारा भाव या तुलनेत न परवडणारा आहे. त्यामुळे सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. दूध उत्पादन करणे हा शेतकऱ्याचा जोडधंदा आहे.

कोट :

पशुखाद्याला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच इंधनाच्या दरांत सतत वाढ होत असल्यामुळे पशुखाद्यांचे दर वाढले आहेत. कोरोना संकट दूध व्यवसायाला मारक ठरत आहे.

- सुभाष जगताप,

दूध डेअरी चालक, वरकुटे-मलवडी

Web Title: Cattle breeders in trouble due to skyrocketing animal feed prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.