कॅमेऱ्यात कैद झाले, चोरट्यांनी सीसीटीव्हीसह डीव्हीआरही लांबविला
By दत्ता यादव | Published: December 19, 2023 06:34 PM2023-12-19T18:34:27+5:302023-12-19T18:34:48+5:30
सातारा : दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील माल चोरला. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत आपण कैद झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी ...
सातारा : दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील माल चोरला. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत आपण कैद झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी सीसीटीव्हीसह डीव्हीआरही चोरून नेला. ही घटना दि. १७ ते १८ डिसेंबर या कालावधीत वाढे फाटा, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुधीर निवृत्ती शिंदे (वय ४२, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) यांचे वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्यावर जयहिंद फर्निचर व भांडी दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तांबे, पितळेची भांडी चोरली.
परंतु सीसीटीव्हीत कैद झाल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही, महागड्या कंपनीचा डीव्हीआर, असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.