आषाढी वारी, बकरी ईद साधेपणात साजरी करा : बोंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:51+5:302021-07-18T04:27:51+5:30

पुसेगाव : ‘पुढच्या आठवड्यात आषाढी वारी व बकरी ईद साधेपणात घरीच साजरी करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ...

Celebrate Ashadhi Wari, Goat Eid in simplicity: Bombay | आषाढी वारी, बकरी ईद साधेपणात साजरी करा : बोंबले

आषाढी वारी, बकरी ईद साधेपणात साजरी करा : बोंबले

Next

पुसेगाव : ‘पुढच्या आठवड्यात आषाढी वारी व बकरी ईद साधेपणात घरीच साजरी करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना समजावून सांगून कोणीही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करू नये. यावर्षी जास्तीत जास्त प्रतीकात्मक स्वरूपात कुर्बानीचा कार्यक्रम करून उत्सव शांततेत व आनंदात साधेपणात साजरा करावा,’ असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी केले.

आषाढी वारी व बकरी ईद या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने पुसेगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व खटाव येथे मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना समजावून सांगण्यात आल्या. वाढत्या चोरीच्या अनुषंगाने ग्रामसुरक्षा दलातील कार्यकर्ते यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या.

बोंबले म्हणाले, ‘आषाढी वारीच्या अनुषंगाने शासनाने पालखी सोहळ्यासाठी चाळीस वारकऱ्यांना एसटीने जाण्यास परवानगी दिलेली आहे. कोणीही पायीवारीने पंढरपूर येथे जाऊ नये. तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरीच करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून गावात रुग्ण सापडल्यास त्यांना समितीच्यावतीने तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल करावे. निकट संपर्कातील लोकांची यादी करून त्यांची कोरोना तपासणी करून घ्यावी. वेळेतच दुकान, हॉटेल सुरू ठेवण्यास सांगावे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करील त्यांच्यावर कोरोना ग्रामसमितीमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पोलीस स्टेशन यांना माहिती द्यावी.’

या कार्यक्रमात पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांचे पोलीस पाटील हजर होते.

फोटो १७पुसेगाव

पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी सूचना केल्या. (छाया : केशव जाधव)

Web Title: Celebrate Ashadhi Wari, Goat Eid in simplicity: Bombay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.