पशुपक्ष्यांसाठी पाणवठे उभारून रंगोत्सव साजरा : ‘पक्षी वाचवा’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:59 PM2018-03-06T22:59:54+5:302018-03-06T22:59:54+5:30
लोणंद : दिवसेंदिवस वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडेझुडपे अन् नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने पशुपक्ष्यांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे वास्तव ओळखून लोणंद
लोणंद : दिवसेंदिवस वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडेझुडपे अन् नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने पशुपक्ष्यांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे वास्तव ओळखून लोणंद येथील सार्थ प्रतिष्ठानच्या वतीने अनोखी रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपचमीत पाण्याचा अपव्यय न करता वृक्षांवर अन् जमिनीवर चारा व पाणवठे उभारून प्रतिष्ठानच्या वतीने ‘पशुपक्षी वाचवा... निसर्ग वाचवा,’ असा संदेश देण्यात आला आहे.
पूर्वी शेकडो जातीचे पशुपक्षी पाहावयास मिळायचे. पक्ष्यांच्या किलबिलीने प्रसन्न वाटायचे; मात्र आज परिस्थिती उलट होऊन बसली आहे. मानवी संस्कृतीत पिंडाला शिवणारा कावळाही दुर्मीळ होऊन बसला आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी सर्व सुख-सुविधा जागेवरच उपलब्ध करून घेतल्या; मात्र या मुक्या पशुपक्ष्यांचे काय? असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. उन्हाच्या चटक्याने सध्या वन्यजीव, पशुपक्ष्यांची भटकंती सुरू झाली आहे. कुणी पाणी देता का पाणी? अशी आर्त हाक मारणाºया मुक्या जीवांना आता पाणवठे, थोडे धान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोणंद येथील सार्थ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवारी अनोख्या पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला.
सर्वत्र पाण्याची नासाडी व रंगांची उधळण केली जात असताना लोणंद व परिसरात प्रतिष्ठानच्या वतीने पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहे. इतकेत नव्हे तर या पक्ष्यांसाठी खाद्याचीही व्यवस्था केली आहे. सार्थ प्रतिष्ठानच्या या ‘पर्यावरणपूरक रंगोत्सवा’चे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
लोणंद येथील सार्थ प्रतिष्ठानच्या वतीने झाडांवर पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून रंगपचमी साजरी करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी खाद्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.