महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:37 AM2021-05-14T04:37:56+5:302021-05-14T04:37:56+5:30
वडूज : सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन श्री बसवेश्वर लिंगायत सेवा मंडळाच्या वतीने ...
वडूज : सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन श्री बसवेश्वर लिंगायत सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले.
येथील श्री महादेव मंदिरात महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा, भस्म, प्रसाद व आरतीचे पान असे साहित्य समाजबांधवांच्या घरोघरी जाऊन श्री बसवेश्वर लिंगायत सेवा मंडळ वडूज यांनी दिले. यावेळी अध्यक्ष श्रीकांत म्हामणे, उपाध्यक्ष किशोर तोडकर, राजेंद्र शेटे, अमित गाढवे, रवींद्र तोडकर, प्रदीप शेटे, प्रमोद बुगड, राहुल व्होरा, दिलीप स्वामी, पिनू शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन मोजक्याच समाजबांधवांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी सर्व लिंगायत समाजबांधवांनी घरी राहूनच बसवेश्वरांच्या फोटोचे पूजन करून व आरती करून जयंती साजरी करावी, अशी विनंती श्री बसवेश्वर लिंगायत सेवा मंडळ यांनी यावेळी केली. याप्रसंगी संतोष शेटे, प्रसाद खटावकर, केदार तोडकर आदींसह समाजबांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.
१३वडूज
फोटो: श्री महादेव मंदिरात बसवेश्वर जंयतीनिमित साहित्याचे वाटप करताना समाजबांधव. (छाया : शेखर जाधव)