येडोबाची यात्रा साध्या पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:41+5:302021-05-01T04:36:41+5:30

कोयनानगर : ‘येडोबाच्या नावानं चांगभलंऽऽऽ’चा गजर नाही, वाद्यांच्या तालातील सासनकाठ्यांसमवेत छबिना नाही... ना गुलाल-खोबऱ्याची उधळण. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ...

Celebrate Yedoba's journey in a simple way | येडोबाची यात्रा साध्या पद्धतीने साजरी

येडोबाची यात्रा साध्या पद्धतीने साजरी

googlenewsNext

कोयनानगर : ‘येडोबाच्या नावानं चांगभलंऽऽऽ’चा गजर नाही, वाद्यांच्या तालातील सासनकाठ्यांसमवेत छबिना नाही... ना गुलाल-खोबऱ्याची उधळण. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २९) पाटण तालुक्यातील येराड येथील येडोबा यात्रेच्या मुख्य दिवशी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत छबिना व इतर विधी पार पडले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येराड येथील येडोबा देवाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही भाविकांविना पार पडली. यंदा कोरोनाची दुसरी लाट असल्याने तालुका प्रशासन व ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वीच यात्रा रद्द केल्याचे जाहीर केले होते. त्याचे भाविक व ग्रामस्थांनी तंतोतंत पालन केले. यात्राकाळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार योगेश टोम्पे व पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी मंदिराच्या परिसराला भेट दिली.

कोट..

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी उत्तम नियोजन करून केवळ पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून देवस्थान परिसरात कसलीही गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली आणि एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

- योगेश टोम्पे, तहसीलदार, पाटण

Web Title: Celebrate Yedoba's journey in a simple way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.