‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी, साताऱ्यात अभिनव उपक्रम

By प्रगती पाटील | Published: June 18, 2024 06:09 PM2024-06-18T18:09:24+5:302024-06-18T18:10:06+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अभिनव उपक्रम

Celebrating Eid by donating blood under Qurbani Chi Artha Nawa, an innovative initiative in Satara | ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी, साताऱ्यात अभिनव उपक्रम

‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी, साताऱ्यात अभिनव उपक्रम

सातारा : सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून, गेली दहा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी  येथे रक्तदान करून ईद साजरी केली.

यावेळी बोलताना अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, अंनिस फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक होळी, पर्यावरण पूरक गणपती अशा अनेक सणाना अधिक मानवी चेहरा देण्याच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना सुरुवातीला विरोध झाला असला तरी आता महाराष्ट्र शासनाने तसेच समाज मनाने देखील हे उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहेत. त्याच पद्धतीने कुर्बानीचा अर्थ नवा ह्या उपक्रमाला देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे खूप आश्वासक आहे.

पैगंबर शेख सारखे तरुण कार्यकर्ते मुस्लिम सुधारणा मंडळाच्यामार्फत बोकडाची कुर्बानी देण्या ऐवजी आर्थिक कुर्बानी हा उपक्रम राबवत आहे आणि त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. माणूस हा मिश्रहारी प्राणी असल्याने अंनिस संघटनेचा विरोध हा मांसाहाराला नसून देवाच्या नावाने बळी देणे ह्या संकल्पनेला आहे.

आज दोन्ही संघटनांच्या वतीने मिळून २३ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये मोहसीन शेख, अलीम बागवान ,जमीर शेख, मिनाज शेख ,सलीम मुलानी ,नजीम इनामदार , इनुसभाई मुलानी, हमीद शेख यांच्या सोबतच अंनिसचे वतीने डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, शामली माने, सिद्धांत वरुटे, संजय दुपटे, अक्षय सपकाळ, बाळासाहेब जाधव, प्रकाश टोळे, विजय जाधव, राजेश पुराणिक, दशरथ रणदिवे, प्रदीप झनकर, अंतू भंडलकर, इ. कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

 माऊली ब्लड बँकेचे अजित कुबेर आणि डॉ. गिरीश पेंढारकर यांनी सर्व रक्तदात्यांचे काैतुक केले. यावेळी माऊली रक्तपेढीचे डॉ. रमण भट्टड, रवींद्र भागवत, रामचंद्र मोरे, भाग्यश्री खरात, मीरा घुले, माधव प्रभुणे, उमेश आडागळे, अनिता पाटोळे, या सर्वांचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शंकर कणसे आणि वंदना माने यांनी प्रयत्न केले.


ईद उल अजहा हा कुर्बानी देण्याचा सण आहे. आपल्याला प्रिय गोष्ट कुर्बान करणे हा त्याचा खरा अर्थ आहे. बोकडाला बळी देवून हा सण साजरा करण्यापेक्षा रक्तदान करून सण साजरा करणे जास्त विधायक पर्याय आहे. हा विचार पटल्याने मी गेली दहा वर्षे अंनिस कार्यकर्ता म्हणून ईद हा सण रक्तदान करून साजरा करत आहे. याला समाजबांधवांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. - मोहसीन शेख, अंनिस कार्यकर्ता

Web Title: Celebrating Eid by donating blood under Qurbani Chi Artha Nawa, an innovative initiative in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.