लिंब येथील कृष्णाबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
By admin | Published: April 26, 2017 01:24 PM2017-04-26T13:24:23+5:302017-04-26T13:24:23+5:30
कन्यागत वर्षानिमित्त कार्यक्रमात नदीला साड्या अर्पण
आॅनलाईन लोकमत
किडगाव (जि. सातारा), दि. २६ : लिंब येथील श्री कृष्णाबाई उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. या उत्सवास ३५० वर्षांची परंपरा आहे. उत्सवामध्ये दररोज श्रींना अभिषेक, पूजा, आरती, मंत्रपुष्प असे धार्मिक कार्यक्रम झाले.
उत्सवात कीर्तन, गायन, मोगरा फुलला हा मीना सुपनेकर यांचा भक्तिगीते, भावगीते, चित्रपट संगीताचा कार्यक्रम, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी पुणे यांचे प्रवचन, श्री कृष्णाबाई भक्त मंडळाचा कार्यक्रम झाला.
कन्यागत वर्षानिमित्त कार्यक्रमात नदीला साड्या अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित वेदशास्त्र संपन्न शंकराचार्य मठ सातारा येथील कृष्णशास्त्री जोशी यांनी पौरोहित्य केले व कन्यागत महात्म्य या विषयावर प्रवचन केले. रात्री गावात श्रींची छबिना मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली.
उत्सवात पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सोसायटीचे अध्यक्ष दत्ता सावंत, आण्णासाहेब सावंत, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष सजेर्राव सावंत, माधवराव गोडबोले, ज्येष्ठ नागरिक संघाचे रामभाऊ जाधव, दत्ताजी थोरात, सुरेश महाजनी, बाळासाहेब देशमुख, एमएसईबीचे अधिकारी, बाळासाहेब व विश्वासराव कुलकर्णी आदी मान्यवरांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला. पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड येथील भाविक श्री दर्शनासाठी आले होते.
उत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही. के. व वाय. के. कुलकर्णी, वारुंजीकर बंधू, विश्वासराव आपटे, प्रकाश कुलकर्णी, गुणेश अभ्यंकर, रामभाऊ अष्टावधानी, श्री कृष्णाबाई भगिनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)