केंद्रप्रमुख आळशी; मुख्याध्यापक बेजबाबदार!--कºहाड पंचायत समिती सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:06 AM2017-09-02T00:06:58+5:302017-09-02T00:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : ‘तालुक्यात आयएसओ मानांकनाचा दावा करणाºया प्राथमिक शाळांकडून गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत. शिक्षण विभागाने नेमलेले केंद्रप्रमुख तर आळशी आहेतच परंतु, मुख्याध्यापक आणि शिक्षकही नेमून दिलेली कामे प्रामाणिकपणे करीत नाहीत. बेजबाबदारपणे वागतात.मराठी शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी आम्ही ओढाताण करीत असताना शिक्षकांना मात्र त्याचे अजिबात गांभीर्य नाही,’ अशा शब्दांत सदस्यांनी शिक्षण विभागाचे वाभाडे काढले.
येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. त्यावेळी रमेश चव्हाण, चंद्रकांत मदने, शरद पोळ या सदस्यांनी शिक्षकांच्या कारभारावर ताशेरे ओढले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शालन माळी होत्या. यावेळी उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल उपस्थित होते.
शरद पोळ यांनी आयएसओ मानांकन देण्यात आलेल्या शाळांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी समिती नेमण्याची पुन्हा मागणी केली. यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी व्ही. एम. गायकवाड यांनी अशी समिती लवकरच काम सुरू करणार असल्याची माहिती दिली. चंद्रकांत मदने यांनी हजारमाची येथील प्राथमिक शाळेच्या शौचालयाची दुरवस्था झाली असल्याचे सांगून तेथील गटाराच्या सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगितले.
गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांनी बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार सर्वेक्षण केल्यानंतर धोकादायक आढळून आलेल्या शाळांच्या खोल्यांमध्ये वर्ग बसविणे बंद केले असल्याची माहिती दिली. स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांना पर्यायी वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यास सांगितले असल्याचीही त्यांनीमाहिती दिली.
बाळासाहेबनिकम आणि सुरेखा पाटील यांनी याबाबत नवीन सर्वेक्षण करून धोकादायक खोल्यांच्या बदली नवीन खोल्या बांधून देण्याची मागणी
केली.देवराज पाटील यांनी जिल्हा विकास निधीच्या गेल्या वर्षीच्या ५७ कोटी रुपयांपैकी केवळ अडीच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने गेल्या वर्षीची उर्वरित रक्कम तसेच यावर्षीची रक्कम तातडीने उपलब्ध करून द्यावी. यासाठी सभागृहाचा ठराव करण्याची मागणी केली.
वीज कंपनीच्या ठेकेदारांनी मीटरचे रिडींग घेण्यासाठी नेमलेल्या कर्मचाºयांकडून मीटरचा फोटोच योग्य प्रकारे काढला जात नाही. त्या फोटोत रिडींगचे आकडेच दिसत नाहीत. याबाबत तक्रार केल्यास सॉफ्टवेअरचे कारण सांगितले जात असल्याची तक्रार चंद्र्रकांत मदने यांनी केली. मीटर रिडींग घेण्याच्या तारखाही वारंवार बदलल्या जाऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.
उपसभापती रमेश देशमुख, चंद्र्रकांत मदने, सुरेखा पाटील यांनी स्वाईन फ्लू आणि डेंग्यूबाबत प्रत्येक गावात सर्वेक्षण करून स्वच्छतेची खबरदारी घेण्याची मागणी केली. गटविकास अधिकाºयांनी पुढील दहा दिवसांत तालुक्यातील सर्व गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती दिली.चंद्रकांत मदने यांनी हजारमाची प्राथमिक आरोग्य केंद्राचे विरवडे येथे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी केली.
चाळीस गावांत दूषित पाणीपुरवठा
तालुक्यात स्वाईन फ्लूचे ७४ रुग्ण आढळले. त्यापैकी २२ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले होते. आतापर्यंत १७ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सर्व गावांमध्ये सर्वेक्षण करून औषध पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. कºहाड तालुक्यातील तब्बल ३९ गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
तर कामावर हजर होऊ देणार नाही
करवडी येथे उभारण्यात आलेली सामाजिक सभागृहाची इमारत म्हणजे केवळ एक सांगाडाच असल्याची टीका करीत त्या कामाची चौकशी करण्याची मागणी सुरेश कुंभार यांनी केली. शरद पोळ यांनी अनेक बदली होऊन आलेल्या ग्रामसेवकांना संबंधित कामावर हजर होऊ देत नाहीत. त्यांना तो अधिकार आहे का, असे विचारत संबंधित पदाधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली.