केंद्राने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:38 AM2021-03-31T04:38:59+5:302021-03-31T04:38:59+5:30

केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मल्हारपेठ ता. पाटण येथे काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन ...

Center should immediately withdraw fuel price hike: Patil | केंद्राने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी : पाटील

केंद्राने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी : पाटील

Next

केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मल्हारपेठ ता. पाटण येथे काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको व उपोषणही करण्यात आले. त्या वेळी अभिजित पाटील बोलत होते. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, पाटण तालुका उपाध्यक्ष डाॅ. संतोष कदम, विलास सपकाळ, पाटण तालुका सोशल मीडिया प्रमुख मेघराज धस, गणेश पाटील, शुभम सूर्यवंशी, अजय चव्हाण, रूपेशकुमार भोई, नंदकुमार पाटील, निसर्ग पाटील, राहुल घाडगे, गणेश संकपाळ आदी उपस्थित होते. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

अभिजित पाटील म्हणाले, केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. महागाईमुळे लोकांना जगणे कठीण झाले आहे. तेव्हा केंद्र सरकारने दरवाढ त्वरित मागे घ्यावी.

Web Title: Center should immediately withdraw fuel price hike: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.